महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.Petrol price is not decided by the central government but by the US, claims Union Minister of State Raosaheb Danve
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करतात, पण पेट्रोलचे भाव केंद्र सरकार नाही तर अमेरिका ठरवते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
देशातील इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून आणि महागाईवरून रविवारी काँग्रेसने मोर्चा काढला. त्यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, पण आपण यावर काही बोलणे योग्य नाही. पेट्रोलचे दर हे आता जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहेत.
रावसाहेब दानवे म्हणाले, उद्धवजींनी पत्र द्यावं, आम्ही लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करतो
त्यामुळे या किंमती वाढण्यामागे केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या रोज खाली-वर होतात. या किंमती आता अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यावरून दोष देणे हे चुकीचे आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व्हॅट कमी करत नाहीत, त्यामुळे किंमती वाढलेल्या आहेत.
Petrol price is not decided by the central government but by the US, claims Union Minister of State Raosaheb Danve
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!