विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. Petrol over 100 in 7 states Today again petrol and diesel price hike
आज पेट्रोलच्या दरात २८ते ३२ पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही ३३ ते ३७ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९९.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.७७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर ११४.१९ रुपये आणि डिझेलचा दर ९८.५० रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत १०८.८५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९३.९२ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल १०५.१८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.३३ रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
Petrol over 100 in 7 states Today again petrol and diesel price hike
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील १० राज्यांत हिंदूच अल्पंसख्यांक, केंद्र सरकाची अल्पसंख्यांकांचा दर्जा शिफारस
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर