विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ७६ ते ८५ पैशांनी, तर डिझेलच्या दरातही ६७ ते ७५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात ८० पैशांनी तर डिझेलच्या दरात ७० पैशांनी वाढ झाली आहे. Petrol, diesel price hike for third day in a row
मुंबईत पेट्रोलच्या दरात ८५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ७५ पैशांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात ८३ पैशांनी, तर डिझेलच्या दरात ७० पैशांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात ७६ पैशांनी, तर डिझेलच्या दरात ६७ पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती. त्यानंतर सलग तीन दिवस वाढ सुरू आहे.
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या घाऊक खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
Petrol, diesel price hike for third day in a row
महत्त्वाच्या बातम्या
- हाडे गोठविणाऱ्या थंडीत झोजिला बोगद्याचे काम आहे सुरू, लेह-लडाख भारताशी कायमस्वरुपी जोडले जाणार
- श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, भारत करणार मदत
- व्हाट्सअॅप आणतंय भन्नाट फीचर, आता 2GB पर्यंतचा चित्रपटही करू शकाल शेअर, टेलिग्रामला देणार टक्कर, वाचा सविस्तर…
- नरेंद्र मोदींना पराभूत करणे अशक्य का नाही, प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण, राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन म्हणाले- मोदींसारखे गुण विरोधी नेत्यांमध्ये नाहीत