• Download App
    पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ। Petrol-diesel companies have the right to set rates Given to the Congress regime; Frequent fuel increase

    पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या राजवटीत इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्याना इंधनाचे दर ठरविण्याचा अधिकार दिल्यामुळे देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढत आहेत.आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल काही पैशांनी वाढले आहे. Petrol-diesel companies have the right to set rates Given to the Congress regime; Frequent fuel increase

    पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर बुधवारी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पुन्हा कडाडल्या आहेत. भारतीय तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL नं बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर २५ पैसे आणि डिझेलचे दर ३७ पैशांनी वाढवले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून १०७.९४ रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत आता ९६.९७ रुपये प्रति लिटर झाली आहे.

    भारतीय तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११३.८० रुपयानंव विकलं जात आहे, तर डिझेल १०४.७५ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोल-डिझेलचे दर मुंबईत आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०८.४५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ९९.७८ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये १०४.८३ प्रति लिटरनं पेट्रोल विकलं जात आहे. तर डिझेल १००.९२ रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे.



    पेट्रोल-डिझेल दरात सातत्यानं वाढ?

    जगभरात कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे. परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ ४ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी क होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.

    देशात अनेक ठिकाणी ओलांडली शंभरी

    देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर १०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.

    पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये का नाही

    पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल ५६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५५ रुपये प्रति लिटर विकलं जाईल.

    Petrol-diesel companies have the right to set rates Given to the Congress regime; Frequent fuel increase

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य