• Download App
    तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्याला त्यांच्या जन्मदिवशी पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी | Permission to garland statue of former Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa on her birth celebration

    तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्याला त्यांच्या जन्मदिवशी पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तामिळनाडू राज्य सरकारच्या वतीने स्वर्गीय माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पुतळ्यावर फुलांची सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 फेब्रुवारी हा दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांचा जन्म दिवस. जे कामराज रोडवरील उच्च शिक्षण परिसरातील या पुतळ्याचे अनावरण करण्याचे तामिळनाडू राज्य सरकारच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. आधीच्या AIADMK राजवटीत हा पुतळा आवारात बसवण्यात आला होता.

    Permission to garland statue of former Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa on her birth celebration

    गुरुवारी जाहीर केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात ह्या संबंधी माहिती देण्यात आली आहे. हा पुतळा आणि परिसराची देखभाल राज्य पीडब्ल्यूडी तर्फे केली जाईल. त्यामुळे कोणत्याही खासगी व्यक्ती किंवा संस्थेला पुतळ्याची देखभाल करण्याची सोय नाहीये.


    सिमी गरेवालने घेतलेल्या मुलाखतीत जयललिता यांनी कोण कोणत्या गोष्टींचा खुलासा केला होता?


    AIADMK चे समन्वयक ओ पनीरसेल्वम यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने उच्च शिक्षण विभाग परिसरात ह्या पुतळ्याचे अनावरण करण्याची परवानगी मागितली होती. त्याचसोबत एक विशेष सूचना देखील देण्यात आली आहे. सरकार तर्फे बनवण्यात आलेल्या कोणत्याही पुतळ्याला ‘दररोज’ हार घालता येणार नाही, असे या सुचनापत्रकात म्हटले आहे. पण जयललिता यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पेशल परमिशन मिळाली आहे.

    Permission to garland statue of former Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa on her birth celebration

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!