रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा साधेपणा सोशल मीडियावर ट्रेंड, रांगेत उभे राहतात नियमानुसार विमानात प्रवेश व्हिडिओ झाला व्हायरल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी मोदींच्या विचारांचे अनुकरण करत एक आदर्श जनतेसमोर प्रस्थापित केला आहे .अश्विन वैष्णव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेमंत्री वैष्णव विमान प्रवासादरम्यान सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. PERFECT GENTLEMAN: Railway Minister Ranget-Ashwini Vaishnav’s simplicity! People said if there should be a minister, then so be it …
हा व्हिडिओ शेअर करणार्या व्यक्तीने लिहिले आहे की, आजच्या काळात एक नगरसेवक सुद्धा व्हीआयपी असल्याचे भासवतो . अशा स्थितीत आपल्या जोधपूरचा अभिमान आणि भारताचे रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव नियमांना अनुसरून मार्गस्थ झाले आहेत. हा नम्रतेचा आणि साधेपणाचा पुरावा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक रेल्वेमंत्र्यांच्या या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
एका फेसबुक युजरने लिहिले आहे की, हे देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत का? त्यांच्या साधेपणावर विश्वास बसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याची घोषणा केली. मोदी सरकारचे मंत्री केवळ मोदींच्या विचारांचे समर्थन करत नाहीत, तर ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही या विचारांनाच फॉलो करत असतात.
PERFECT GENTLEMAN : Railway Minister Ranget-Ashwini Vaishnav’s simplicity! People said if there should be a minister, then so be it …
-
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं