• Download App
    ‘’औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलणारे लोक क्षुद्र’’ भालचंद्र नेमाडेंचे विधान!People who change the name of Aurangabad and Osmanabad are petty statement of Bhalchandra Nemade

    ‘’औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलणारे लोक क्षुद्र’’ भालचंद्र नेमाडेंचे विधान!

    हिंदू कांदबरीच्या आगामी कथानकाबाबतही दिली  माहिती

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. ‘’औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नाव बदलणारे लोक क्षुद्र आहेत. यातून काहीच साध्य होणार नाही.’’ असं त्यांनी म्हटलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराई संस्थेच्यावतीने देशी बियाणांद्वारे भालचंद्र नेमाडे यांची बीजतुला करण्यात आली. याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. People who change the name of Aurangabad and Osmanabad are petty statement of Bhalchandra Nemade

    भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले की, हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती ज्याप्रमाणे नष्ट झाली, तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली आहे. तसेच, औरंगाबादला पाणी द्या, तिथे चांगली झाडे लावा असेही त्यांनी यावेळी सूचवले. तसेच, ज्या मातीतून आपण उगवलो त्या मातीशी कृतज्ञ राहणं म्हणजे देशीवाद आहे, असे नेमाडे यांनी म्हटले.

    याशिवाय त्यांनी हिंदू कांदबरीच्या आगामी कथानकाबाबतही माहिती देताना सांगितले की, ‘’पुढील भागात खंडेराव हा पुरातत्व खात्यात नोकरी सुरू करतो, पुरातत्व संशोधन करत तो तक्षशीलेला पोहचतो. तेव्हा त्याला ग्रीस व युरोपातून इथे लोक शिक्षणासाठी येत असल्याचे जाणवते.’’

    याचबरोबर प्रमाण मराठी भाषा असं काही नाही, प्रत्येकाची भाषा तितकीच प्रमाण व शुद्ध आहे. इंग्रजी शाळांमधून शिकणारी मूलं पुढं काही बनू शकत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो, असे निरीक्षणही यावेळी नेमाडे यांनी सांगितलं.

    People who change the name of Aurangabad and Osmanabad are petty statement of Bhalchandra Nemade

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू