• Download App
    दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर|People saved five elphants

    दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी – आसाममध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दलदल असलेल्या एका तलावात अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूपरित्या बाहेर काढले.People saved five elphants

    मेघालय सीमेलगत असलेल्या गोलपारा जिल्ह्यात चोईबाडी भागात बुधवारी रात्री हत्तीचा एक कळप तलावात फसला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.



    दोन ग्रामस्थांनी दलदल असलेल्या तलावाचा काठावर खोदकाम केले आणि त्यामुळे हत्तींना बाहेर येण्यास सोपे झाले.पाच हत्तींचा कळप हा मेघालयाच्या जंगलातून आसाममध्ये आला असावा, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यादरम्यान, आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेने दोन हत्तींचा मृत्यू झाला.

    People saved five elphants

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gujarat ST bus : गुजरातमध्ये दोन एसटी बसेसची भीषण धडक; एक बस पेटली, ७ जणांचा मृत्यू, ४० हून अधिक प्रवासी जखमी

    Mumbai Police : मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; ७४ कोटींचा अमली पदार्थ कारखाना उद्ध्वस्त, राज्याच्या सीमापार जाऊन माफियांना मोठा दणका

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जींविरोधात बंडाची कुजबुज? ८० पैकी ५० आमदारांच्या गुप्त बैठकीचा दावा; ‘तृणमूल आता ममतांचा पक्ष राहिलेला नाही’