वृत्तसंस्था
मुंबई : एकीकडे जनता महागाईने होरपळत असताना आणि त्रस्त असताना राज्यातील आमदार मंडळी तुपाशी असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना मिळणारे वेतन भत्ते आणि अन्य सुविधांचे आकडे पाहिले तर जबरदस्त धक्का बसतो. People are suffering from inflation; If you look at salaries and allowances of MLA , it is a huge shock
जनतेचे नोकर असलेली ही मंडळी सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून स्वतःची पाच वर्षात घर भरणी वेगळी करत असल्याने त्यांना जनतेचे सेवक कसे म्हणायचे असा प्रश्न निर्माण होत आहे.
राज्यातील आमदारांना मुंबईत नुकतीच घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण, आमदार अगोदरच तुपाशी आहेत. सरकारी सेवांचा ते पुरेपूर फायदा उठवत आहेत. त्यांना मिळणारे लाभ पाहता प्रत्येक आमदार तुपाशी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
आमदारांना मिळणारे लाभ
वेतन : महिना १ लाख ८२ हजार २०० रुपये
महागाई भत्ता : ३० हजार ९७४ रुपये
संगणकासाठी : १० हजार रुपये
संगणक चालकाचे वेतन: १० हजार रुपये
पर्सनल असिस्टंट वेतन : महिना २ लाख ५० हजार
टेलिफोन बिल : महिना ८ हजार रुपये
अधिवेशन काळात : दररोज २ हजार रुपये भत्ता, या शिवाय जेवण, राहणे मोफत आहे.
पेन्शन : पाच वर्ष झाल्यानंतर महिना ५० हजार रुपये
People are suffering from inflation; If you look at salaries and allowances of MLA , it is a huge shock
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिकेत पोलखोल अभियान राबवून भाजप काढणार शिवसेनेचे वाभाडे
- Weather Update : राज्यात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट, मराठवाडा-विदर्भासह उत्तर-मध्य महाराष्ट्र तापणार, IMDचा सावधगिरीचा इशारा
- Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मिरात कधी होणार निवडणुका? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले उत्तर, वाचा सविस्तर…
- Axis-City Bank Deal : ऑक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार