वृत्तसंस्था
कोटा : सध्याच्या काळात विवाहासारख्या घरगुती सोहळ्यातून अनेकांना संसर्ग होण्याचा धोका वर्तविला जातो. मात्र जगरहाटीच्या नावाखाली विवाहाला गर्दी होत आहे. तसेच झाल्यास धोका आणकी वाढणार आहे. त्यामुळे सरकारने मध्यम मार्ग म्हणून लोकांच्या प्रबोधनावार भर देण्यास ठरविले आहे. या कामी पोलसांची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जात आहे. people are postponing marriages due to corona
राजस्थानमध्ये १० ते २४ मे दरम्यान कडक लॉकडाउन लावण्यात आले आहे. त्यानुसार विवाह केवळ न्यायालयात किंवा घरामध्ये करता येते. उपस्थितीची मर्यादा केवळ ११ व्यक्तींची आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रयत्न करीत जवळपास ७५ पेक्षा जास्त विवाह लांबणीवर टाकण्यास नातेवाईकांना राजी केले आहे.
पोलिस पुढाकार घेत लग्न लांबणीवर टाकण्यास नागरिकांना तयार करीत आहेत. ग्रामपंचायत पातळीवर बैठका घ्याव्यात. त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या व्यक्तींना आमंत्रित करावे. त्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लग्न पुढे ढकलण्यास कुटुंबांना तयार करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी मोहीमच राबविण्यात आली. त्यामुळे एका दिवसात ७५ हून जास्त लग्न पुढे ढकलण्यात आली.