• Download App
    पेगॅससप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय स्थापणार तज्ज्ञांची समिती |Pegasis issue, SC will form Commitee

    पेगॅससप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय स्थापणार तज्ज्ञांची समिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – ‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून ठेवलेल्या कथित पाळत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची विशेष समिती स्थापन करण्यात येईल असे निरीक्षण नोंदवितानाच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पुढील आठवड्यात अंतरिम आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले.Pegasis issue, SC will form Commitee

    या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. तत्पूर्वी केंद्र सरकारने स्वतःच्या पातळीवर तज्ज्ञांच्या समितीकडून चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ही समिती स्थापन करण्याचे जाहीर केले आहे.



    आम्ही जी तज्ज्ञांची समिती स्थापन कर इच्छितो त्या समितीत सहभागी होण्यासाठी अनेक तज्ज्ञ आणि मान्यवरांनी अनिच्छा दर्शविली असून त्यामुळेच तिच्या स्थापनेसाठी इतका वेळ लागतो असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

    पुढील आठवड्यांपर्यंत आम्ही काही तज्ज्ञांची नावे निश्चि्त करत आहोत. हे काम उरकल्यानंतरच अंतिम आदेश देऊ, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.

    इस्राईलमधील ‘एनएसओ’ या कंपनीच्या पेगॅसस या स्पायवेअरच्या माध्यमातून केंद्र सरकारने विरोधी पक्ष नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप होतो आहे.

    Pegasis issue, SC will form Commitee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये