प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. गौतम अदानी यांनी शुन्यातून सुरुवात केली असून आता देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. Pawar praises Gautam Adani; Many raised eyebrows!
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने पुण्यात आयोजित केलेल्या परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते “प्राईड ऑफ पुणे” पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
याच परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्यूअली उद्घाटन केले होते. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमध्ये आणि आर्थिक विकासामध्ये जैन समाजाचे फार मोठे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पंतप्रधान पाठोपाठ शरद पवारांनी देखील गौतम अदानी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली, त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
2014 मध्ये देखील शरद पवारांनी आदराने यांच्याबरोबर काही गुप्त समझोता केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या नरेंद्र मोदींना अनुकूल ठरतील, त्यावेळी चर्चा होती. त्यामुळे त्यावेळी काँग्रेस नेते अस्वस्थ झाले होते.
आता देखील जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन च्या कार्यक्रमात मोदी यांच्या पाठोपाठ दोन दिवसांनी शरद पवारांनी अदानी यांची स्तुती केल्याने त्यावर राजकीय चर्चा सुरू आहे.
शरद पवार म्हणाले की एकेकाळी बिर्ला आणि टाटा यांचा श्रीमंतांच्या यादीत समावेश होता. आता त्यांची जागा बदलली आहे. आता आठवडाभरापासून मी एका जैन माणसाबद्दल वाचतोय जो देशातील सर्वात श्रीमंत माणूस बनला आहे. हा माणून आहे गौतम अदानी. अदानी माझे चांगले मित्र असून त्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आहे. आता विमानातून कुठेही गेले तरी अदानी यांचेच विमानतळ वापरावे लागते. जवळपास 70 टक्के विमानतळ अदानी यांच्या मालकीचे आहेत.
पायाभूत सुविधा हा विकासाचा आधार असून या क्षेत्रात अदानी यांचे मोठे योगदान आहे. गौतम अदानी हे देशाला पुढे घेऊन जात आहेत. विमानसेवा, परदेशात आयात-निर्यात, पायाभूत सुविधा या क्षेत्रात ते चांगले काम करत आहेत, असे कौतुक शरद पवार यांनी यावेळी केले.
– 123 अब्ज डॉलर संपत्ती
गौतम अदानी सातत्याने यशाची शिडी चढत आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अदानी 123 अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.
वॉरेन बफे 121.7 अब्ज डॉलर संपत्तीसह सहाव्या स्थानावर घसरले आहेत. आदी ते पाचव्या क्रमांकावर होते. अदानी यांच्या पुढे जगातील सर्वात श्रीमंत एलोन मस्क, अमेझॉनचे जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि बिल गेट्स हे लोक आहेत.
Pawar praises Gautam Adani; Many raised eyebrows!
महत्वाच्या बातम्या
- १० मे आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!
- Census : देशात पहिल्यांदाच ऑनलाईन जनगणना; लाभ पोहोचवण्यातही अचूकता; अमित शहांची घोषणा!!
- 124 ए : देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता सर्वोच्च, त्यात तडजोड नाही!!; राजद्रोह कायद्याबाबत कायदेमंत्री किरण रिजिजू यांची स्पष्टोक्ती!!
- NIA Dawood Ibrahim : एनआयए छाप्यांची व्याप्ती मोठी; दाऊदच्या 30 अड्ड्यांवर छापे; सलीम फ्रुट, कय्यूम कुरेशी, अजय गोसलिया ताब्यात!!