• Download App
    ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्सची निवड, अनेक वर्षानंतर गोलंदाजाला बहुमान; उपकर्णधारपदी स्टीव्ह स्मिथची निवड । Pat Cummins is officially the 47th captain of the Aussie Men's Test team #Ashes

    ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्सची निवड, अनेक वर्षानंतर गोलंदाजाला बहुमान; उपकर्णधारपदी स्टीव्ह स्मिथची निवड

    वृत्तसंस्था

    सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची निवड केली आहे. तो ऑस्ट्रेलियाचा ४७वा कसोटी कर्णधार ठरला आहे. स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार बनवले आहे. ६५ वर्षात पहिल्यांदाच एखादा गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करेल. कमिन्सने टिम पेनची जागा घेतली आहे. Pat Cummins is officially the 47th captain of the Aussie Men’s Test team #Ashes

    एका महिलेला अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका होणार आहे. पॅट कमिन्सने आतापर्यंत ३४ कसोटी, ६९ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कमिन्स कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.



    रेमंड लिंडवॉल यांनी भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. रे लिंडवॉल हे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारे शेवटचे वेगवान गोलंदाज होते. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला ही संधी मिळाली नाही.

    Pat Cummins is officially the 47th captain of the Aussie Men’s Test team #Ashes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे