विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :: सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आमचाच असेल. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करणे, ही ऐतिहासिक चूक होती, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.Partition on the basis of religion is a historic mistake, states Defense Minister Rajnath Singh
राजनाथ सिंह म्हणाले, १९७१ च्या युद्धात आमच्या सशस्त्र दलांनी मुक्तिवाहिनीला पाठिंबा दिला. लाखो निर्वासितांना मदत केली. तसेच पश्चिम आणि उत्तरेकडील सर्व प्रकारचे आक्रमण रोखले. त्यांनी शांतता, न्याय आणि मानवतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची विश्वासार्हता सुनिश्चित केली.
इतिहासात हे क्वचितच पाहायला मिळते की, एखाद्या देशाला युद्धात पराभूत केल्यानंतर दुसरा देश आपले वर्चस्व लादत नाही, तर आपल्या राजकीय प्रतिनिधीकडे सत्ता सोपवतो. भारताने हे केले कारण तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांची विशेष आठवण काढली. देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांची मला खूप आठवण येते आहे. देशाने एक पराक्रमी सैनिक, सक्षम सल्लागार आणि चांगला माणूस गमावला.
Partition on the basis of religion is a historic mistake, states Defense Minister Rajnath Singh
महत्त्वाच्या बातम्या
- काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी
- राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!
- राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींसमोर काशीमध्ये आज प्रेझेन्टेशन
- लबाडांना रोखण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कडक नियमावली जारी
- कॉँग्रेस १० वर्षांत ५० हून अधिक निवडणुका हारली, प्रशांत किशोर यांची टीका