वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी निर्धारित मुदतीच्या चार दिवस आधीच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.Parliament session adjourned prematurely, 47 hours in Rajya Sabha, 44.29 hours in Lok Sabha
पावसाळी अधिवेशनात गदारोळामुळे राज्यसभेत ४७ तास कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेतही ४८%च कामकाज होऊ शकले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले की, एकूण १६ बैठका झाल्या, त्यात ४४.२९ तास कामकाज झाले. १८ जुलैपासून सुरू झालेले अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार होते. लोकसभेत सहा विधेयके सादर तर सात विधेयके मंजूर झाली.
सभापतींना निरोप, मोदींकडून कौतुक
राज्यसभेत अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांचा हा शेवटचा दिवस होता. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला पूर्ण होणार आहे. राज्यसभेत सोमवारी त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नायडूंची प्रशंसा करताना भावुकही झाले होते.
मला कधीही राष्ट्रपती होण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. त्याचबरोबर कधी असमाधानीही राहणार नाही. मला लोकांसोबत राहायला आवडते. त्यांच्याशी यापुढेही संवाद ठेवू इच्छितो, अशा शब्दांत राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी भावना व्यक्त केल्या.
नायडू पुढे म्हणाले, जीवनात कधीही कुणाच्या पाया पडलो नाही. आपल्या भाषणात नायडूंनी पाच वेळा मोदींचा उल्लेख केला. त्यात त्यांनी उपराष्ट्रपती कसे झाले याबद्दलचा किस्साही सांगितला. पंतप्रधानांचा मला फोन आला. त्या दिवशी माझ्या डोळ्यांत अश्रू आले. आता आपल्याला पक्ष सोडावा लागेल या विचारांनी अश्रू आले होते. देवानंतर अटलजी व आडवाणींना मानत होतो. परंतु कुणाच्याही पाया पडलो नाही. आदर, स्नेह कायम होते. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले, हा अत्यंत भावुक असा क्षण आहे. सभागृहाचे नेतृत्व करण्याची तुमची जबाबदारी पूर्ण झाली. तुमच्या अनुभवांचा लाभ देशाला मिळेल. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली.
सभागृहात शिस्त ठेवण्याचा प्रयत्न केला
नायडू म्हणाले, सभागृहात शिस्त, नियमांचे पालन केले जावे यासाठी नेहमी प्रयत्न केले. सर्व पक्ष, दक्षिण-उत्तर, पूर्व-पश्चिम अशा सर्वांचे समायोजन व्हावे असा उद्देश होता. राज्यसभेच्या सदस्यांनी शालीनता, गौरव, मर्यादांचे पालन केले पाहिजे, असे माझे आवाहन आहे.
Parliament session adjourned prematurely, 47 hours in Rajya Sabha, 44.29 hours in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- केवळ मंत्रिमंडळ विस्तारातच स्पर्धा नव्हे; तर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसमध्ये संघर्ष!!
- मोदींना छेडताना शशी थरूर यांनी उकरून काढली 1962 ची नेहरुंची “जखम”!!; काँग्रेस हायकमांड नाराज!!
- शिंदे गटाचे आमदारांना फोन गेले, हे खरे!!; पण मंत्रिमंडळ समावेशाबाबत निरोप नव्हे!!
- TET Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यात ईडीची एंट्री!!; करणार मनी लॉंड्रिंगचा तपास!!