parle g Biscuit rumors in bihar : देशात कधी कोणती अफवा पसरेल, याचा काही नेम नाही. या डिजिटल युगात व्हॉट्सअपवरही अंधश्रद्धा पसरवण्याचे काम सर्रास सुरू आहे. बिहारच्या सीतामढीमध्ये पार्ले-जी बिस्किटाशी संबंधित अशीच एक अफवा पसरल्याने खळबळ उडाली आहे. ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, तेथील किराणा दुकानांतून पार्ले-जी बिस्किटेच संपून गेली. parle g Biscuit rumors in bihar sitamarhi on occasion Of jitiya Festival, Sudden Increase In Sell Of Parle G
प्रतिनिधी
सीतामढी : देशात कधी कोणती अफवा पसरेल, याचा काही नेम नाही. या डिजिटल युगात व्हॉट्सअपवरही अंधश्रद्धा पसरवण्याचे काम सर्रास सुरू आहे. बिहारच्या सीतामढीमध्ये पार्ले-जी बिस्किटाशी संबंधित अशीच एक अफवा पसरल्याने खळबळ उडाली आहे. ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, तेथील किराणा दुकानांतून पार्ले-जी बिस्किटेच संपून गेली.
सीतामढीमध्ये पार्ले-जी बिस्किटला तेथील स्थानिक जितिया सणाशी जोडून एक अफवा पसरवण्यात आली होती. यानुसार, घरातील सर्व मुलांना पार्ले-जी बिस्किटे खाऊ घालावीत, अन्यथा त्यांच्यासोबत काही अनुचित घटना घडतील, असे सांगण्यात येत होते. जितिया या सणाच्या दिवशी मुलांच्या दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी त्यांच्या आई उपवास ठेवत असतात.
अफवा पसरताच दुकानांवर पार्ले-जी खरेदीसाठी उड्या
अफवेचा प्रभाव एवढा मोठा होता की, तेथील दुकानांमधून पार्ले-जी बिस्किटांचा साठाच संपून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, लोक अजूनही या अफवेवर विश्वास ठेवत आहेत. ही अफवा सीतामढी जिल्ह्यातील बैरगनिया, धेंग, नानपूर, डुमरा, बाजपट्टी, मेजरगंजसह अनेक ठिकाणी पसरली आहे.
ही अफवा कधी आणि कोठून पसरली हे अद्याप समजू शकलेले नाही. पण या अफवेमुळे बिस्किटांच्या विक्रीत अचानक वाढ झाली. लोक गुरुवारी उशिरापर्यंत पार्ले-जी बिस्किटे खरेदी करताना दिसले. जेव्हा लोकांना विचारण्यात आले की, ते ते का विकत घेत आहेत? तर ते म्हणाले की पार्ले जी बिस्किटे न खाल्ल्याने अनर्थ घडू शकतो. दुकानदाराने म्हटले की, प्रत्येकजण फक्त पार्ले-जी बिस्किटे मागत आहे. अफवा काहीही असो, पण यामुळे पार्ले-जीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
parle g Biscuit rumors in bihar sitamarhi on occasion Of jitiya Festival, Sudden Increase In Sell Of Parle G
महत्त्वाच्या बातम्या
- Navratri 2021 : मूर्ती विसर्जनावेळी फक्त पाच जणांना परवानगी, बीएमसीने नवरात्रोत्सवासाठी जारी केली नियमावली
- नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.५ तीव्रता, केंद्रबिंदू जमिनीच्या ३ किमी आत
- राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, सरकारकडून लेखी आश्वासनावर ठाम; आपत्कालीन रुग्णसेवा पुरवणार
- Farmers Protest : तुम्ही शहराचा श्वास कोंडत आहात, लोकांनी व्यवसाय बंद करावेत का?, सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले
- Happy Birthday President : राष्ट्रपती कोविंद यांचा जन्मदिन, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही केली वकिली, यूपीतून या पदावर पोहोचणारे पहिले