• Download App
    दिलासादायक : भारतात तयार होणार रशियाची लस, Sputnik Vच्या 10 कोटी डोसची दरवर्षी होणार निर्मिती । Panacea Biotec to produce 100 million doses of Sputnik V vaccine in India per year

    दिलासादायक : भारतात तयार होणार रशियाची लस, Sputnik V च्या 10 कोटी डोसची दरवर्षी होणार निर्मिती

    Sputnik V : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच महत्त्वाचा उपाय आहे. सध्या लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी भारताने लस निर्यात करणे तात्पुरते थांबवले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, भारतात रशियन लसीचे उत्पादन करण्यास पॅनेसिया बायोटेकने मंजुरी दिली आहे. Panacea Biotec to produce 100 million doses of Sputnik V vaccine in India per year


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच महत्त्वाचा उपाय आहे. सध्या लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी भारताने लस निर्यात करणे तात्पुरते थांबवले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, भारतात रशियन लसीचे उत्पादन करण्यास पॅनेसिया बायोटेकने मंजुरी दिली आहे.

    पॅनेसिया बायोटेक या रशियन कंपनीनुसार, दरवर्षी भारतात स्पुटनिक-व्ही लसीचे 10 कोटी डोसची निर्मिती होईल. यासंदर्भात माहिती देताना कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि पॅनेसियाच्या संयुक्त निवेदनानुसार, पॅनेसिया बायोटेकच्या उत्पादक प्रकल्पांमध्ये स्पुटनिक व्हीचे उत्पादन आरडीआयएफच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना ही लस पुरवण्यास मदत करेल.

    दरम्यान, सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट चालू आहे, जी पूर्वीपेक्षा धोकादायक आहे. केंद्र सरकारच्या मते, पुढील चार आठवडे देशासाठी अत्यंत नाजूक आहेत. आरोग्य मंत्रालयाने आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेदरम्यान नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांना ही बाब सांगितली.

    आरोग्य मंत्रालयाने म्हटलेय की, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता खूप जास्त आहे आणि हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांचा सहभाग हा एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करेल. म्हणूनच लोकांना घरातून अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडणे टाळावे. दो गज दुरी आणि मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    Panacea Biotec to produce 100 million doses of Sputnik V vaccine in India per year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!