• Download App
    पॅन - आधार लिंक करायला तीन वेळा मुदतवाढ, नंतर 1000 रुपयांच्या दंडाचा इशारा, पण राजू शेट्टींना दिसतोय केंद्राचा "जिझिया कर"!!Pan - aadhar link government deadline extension, but raju shetti spreading false information

    पॅन – आधार लिंक करायला तीन वेळा मुदतवाढ, नंतर 1000 रुपयांच्या दंडाचा इशारा, पण राजू शेट्टींना दिसतोय केंद्राचा “जिझिया कर”!!

    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करायचे होते. पण आता हीच मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढविली देखील आहे आणि त्यानंतर केंद्र सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी 1000 रुपयांची पेनल्टी अर्थात दंड जाहीर केला आहे. Pan – aadhar link government deadline extension, but raju shetti spreading false information

    मात्र आता या मुद्द्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक ट्विट केले आहेत आणि त्यामध्ये केंद्र सरकार 44 हजार कोटी रुपयांचा डल्ला मारून सर्वसामान्य जनतेकडून जिझिया कर गोळा करत असल्याचा आरोप केला आहे.


    PAN-Aadhaar linking : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या अंतिम तारीख


    प्रत्यक्षात केंद्र सरकारने पॅन आणि आधार लिंक साठी किमान तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्या मुदतीत लिंक केले, तर दंड सोडा पण 1 रुपयाचेही शुल्क नाही. वारंवार मुदतवाढ देऊनही जर पॅन आणि आधार लिंक लिंक केले नसेल तर 1000 रुपयांचा रुपयांची पेनल्टी भरून मग लिंक करता येईल, असे आयकर विभागाच्या वेबसाईटवर दिसत आहे. पण याचाच आधार घेऊन राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार भारतीय नागरिकांकडून 44 हजार कोटी रुपयांचा जिझिया कर गोळा करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र प्रत्यक्षातली वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे दिसत आहे.

    Pan – aadhar link government deadline extension, but raju shetti spreading false information

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!