• Download App
    पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्यास बंगळूरमध्ये अटक |Pakistan's ISI spy arrested in Bangalore

    पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्यास बंगळूरमध्ये अटक

    बंगळूर – पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून बंगळूरमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तो मुळचा राजस्थानचा असून तयार कपड्यांचा विक्रेता म्हणून वावरत होता.Pakistan’s ISI spy arrested in Bangalore

    त्याचे नाव जितेंद्र सिंह असे असून कॉटनपेट परिसरातील जॉली मोहल्ला येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. बंगळूरमधील महत्त्वाच्या संस्थांची माहिती आणि छायाचित्रे त्याने पुरविल्याचा आरोप आहे.



    जितेंद्र सिंह याच्याकडे पोलिसांना लष्करातील कॅप्टनचा गणवेश आढळला. लष्करी अधिकारी असल्याचा बनाव रचून तो हेरगिरीच्या कारवाया पार पाडायचा असे पोलिसांनी सांगितले.

    लष्कराच्या दक्षिणेतील मुख्यालयाचा लष्करी गुप्तचर विभाग आणि बंगळूरमधील केंद्रीय गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.जितेंद्र एसएमएस, ऑडिओ तसेच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून माहिती पुरवायचा.

    पाकमधील हस्तकांच्या सांगण्यावरून त्याने आंतरराष्ट्रीय सीमेजवळील लष्करी चौक्यांची त्यांनी टेहळणीही केली होती. बारमेर येथील लष्करी तळ आणि तेथून होणाऱ्या लष्करी वाहनांच्या हालचालींचा तपशीलही त्याने पुरविला होता.

    Pakistan’s ISI spy arrested in Bangalore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र