वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानात राजनैतिक संकट पंतप्रधान इम्रान खान भोवती गडद होत असताना पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा ऍक्टिव्हेट झाले असून कोणत्याही क्षणी तेथे इम्रान खान यांचा तख्तापलट करून पाकिस्तानी लष्कर आपल्या ताब्यात सत्ता घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. Pakistan Military Coup: Imran Khan’s coup at any moment in Pakistan !!; Army chief Bajwa activated !!
– सत्ताधारी खासदारांचे बंड
पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या “पाकिस्तान तहरीक ए इन्साफ” या पक्षाच्या खासदारांनी बंड केले आहे. त्यामुळे सरकार चोहोबाजूंनी अडचणीत आले आहे. विरोधी पक्ष मुस्लिम लीग नून इम्रान खान यांच्यावर प्रखर राजकीय हल्ले करत आहे. कोणत्याही स्थितीत इम्रान खानचा तख्तापलट करायचाच या हेतूने विरोधक पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत एकवटून आणि रस्त्यावर उतरले आहेत.
– बाजवा – इम्रान खान भेट
शुक्रवारपासून लष्कर ऍक्टिव्हेट झाले असून जनरल कमर जावेद वाजवा यांनी इमरान खान यांची भेट घेऊन त्यांना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स (ओआयसी) मीटिंग नंतर पायउतार होण्यास सांगितले आहे. त्यांच्या जागी आपल्याला अनुकूल असलेल्या व्यक्ती पंतप्रधानपदावर बसवण्याचा जनरल बाजवा यांचा मानस असल्याचे बोलले जात आहे. एक प्रकारे पाकिस्तानतील पुढची सत्ता लष्करशाही नियंत्रणातली लोकशाही असेल अशी चर्चा आहे.
– फजल उर रहमान “डिझेल”
विरोधी पक्षाचे नेते मौलाना फजल उर रहमान यांना इम्रान खान याने “डिझेल”, असे संबोधू नये असे बाजवा यांनी इम्रान खान यांना बजावले आहे. त्यावर “डिझेल” हे नाव त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने सांगितल्याचे इमरान खान म्हणाले. मौलाना फजल उर रहमान डिझेल कंत्राटे देताना पैसे खातात त्यामुळे त्यांना “डिझेल” असे हिणवले जाते, याची आठवण इम्रान खान यांनी जनरल बाजवा यांना करून दिली.
Pakistan Military Coup: Imran Khan’s coup at any moment in Pakistan !!; Army chief Bajwa activated !!
महत्त्वाच्या बातम्या
- डॉ.बलजीत कौर यांना ‘आप’ चा नियम नाही?
- Kirit Somaiya – Yashwant Jadhav : यशवंत जाधवांचा 1000 कोटींचा घोटाळा, 36 इमारतींची खरेदी, पण कोणत्या?; किरीट सोमय्यांच्या आरोपातून खुलासा!!
- हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; तामिळनाडूतील तिघांविरोधात गुन्हा दाखल
- एसटीचे ११ हजार कंत्राटी चालकच बनणार वाहक, कर्मचारी संपामुळे नवीन भरतीसाठी संस्थेला ठेका