वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तान एकीकडे प्रचंड राजकीय संकटात आणि आर्थिक गर्तेत सापडला असताना आपल्या अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी तो देश भारताची संबंध सुधारण्याच्या दृष्टीने घायकुतीला आला आहे. भारताबरोबरचे संबंध ठीक ठाक करून आपली किमान अन्नाची गरज भागविण्यासाठी पाकिस्तानच्या डिप्लोमॅटिक चॅनल्सनी ट्रॅक 2 डिप्लोमसीचा वापर करत भारतीय अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.Pakistan hurts to improve relations with India
– मुळात गरज का पडली?
– भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाणी वाटपासंदर्भात अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु पाकिस्तान सध्या प्रचंड राजकीय सामाजिक संकटातून जात आहे. आर्थिक गर्तेत सापडला आहे. पाकिस्तानात महागाई एवढी प्रचंड वाढली आहे की नजीकच्या काळात श्रीलंके सारखी अवस्था झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
पाकिस्तानला इंटरनेशनाल मॉनेटरी फंड अर्थात आयएमएफने पतपुरवठा करणे देखील नाकारले आहे. पाकिस्तानात धान्याची टंचाई देखील प्रचंड वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून थोडा गहू मिळाला तर पाकिस्तानला हवा आहे. पाकिस्तान गहू आयातीसाठी रशियाशी चर्चा करत आहे. परंतु पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता यामुळे मोठा अडथळा ठरत आहे. अशा स्थितीत भारताकडून काही महिन्यांसाठी गव्हाची बेगमी करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा दिसतो आहे. यासाठीच पाकिस्तानी अधिकारी भारताशी ट्रॅक 2 डिप्लोमसीच्या आधारे चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
– ताणलेले संबंध
इम्रान खान सरकारच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. पुलवामा तील दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक, त्यानंतर 370कलम काश्मीरमधून हटवणे या मुद्द्यांमुळे पाकिस्तान आधीच बॅकफूटवर गेला आहे.
– दुबळे पाकिस्तानी सरकार
त्यात आता इम्रान खानचे सरकार अस्तित्वात नाही. शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार अस्तित्वात आले आहे त्या सरकार पुढे प्रचंड मोठी आर्थिक समस्या वाढून ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकृतपणे पाकिस्तान सरकार भारताशी बरोबरीच्या नात्याने चर्चा करण्याच्या स्थितीत अजिबात उरलेले नाही.
– जीवनावश्यक वस्तूंसाठी मनधरणी
म्हणूनच ट्रॅक 2 डिप्लोमसीचा वापर करून भारताशी किमान गरजेपुरती चर्चा करण्याचे आणि काही जीवनावश्यक वस्तू मिळविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आहेत. पाकिस्तानच्या एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. पाकिस्तानात मंत्रीपदावर असताना आपले नाव न सांगण्याच्या अटीवर अशी माहिती देण्याची वेळ येते यातच भारताच्या तुलनेत पाकिस्तान राजनैतिक पातळीवर किती पिछाडीवर गेला आहे हे दिसून येते आहे.
Pakistan hurts to improve relations with India
महत्वाच्या बातम्या