घोर आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. कहर म्हणजे पाकिस्तान सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकत नाही. आतापर्यंत सरकारी कर्मचारी केवळ यावर बोलतच होते, मात्र आता त्यांची व्यथा जगासमोर आली आहे. पाकिस्तानमधील सर्बियन दूतावासाच्या अधिकृत ट्विटर पेजवरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ट्विट करून आपल्या वेदना शेअर केल्या आहेत.Pakistan embassy expressed grief over not getting salary on Twitter, wrote – Sorry Imran, there was no option
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : घोर आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. कहर म्हणजे पाकिस्तान सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगारही देऊ शकत नाही. आतापर्यंत सरकारी कर्मचारी केवळ यावर बोलतच होते, मात्र आता त्यांची व्यथा जगासमोर आली आहे. पाकिस्तानमधील सर्बियन दूतावासाच्या अधिकृत ट्विटर पेजवरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ट्विट करून आपल्या वेदना शेअर केल्या आहेत.
सर्बियाच्या दूतावासाने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘महागाईने आपले पूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत, त्यामुळे सरकारी कर्मचारी गप्प बसतील आणि गेले तीन महिने पगार न देता काम करत राहतील, अशी अपेक्षा इम्रान खान किती दिवस करततील. आम्ही आमच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यास असमर्थ आहोत. फी न भरल्याने त्यांना शाळेतूनही काढून टाकण्यात आले आहे.”
या ट्विटसोबत आणखी एक ट्विट करण्यात आले असून इम्रान खान यांना टॅग करत, आम्हाला माफ करा, आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता, असे लिहिले आहे. यासोबतच या ट्विटमध्ये एक फोटोही टाकण्यात आला आहे, ज्यावर लिहिले आहे- ‘तुम्ही घाबरू नका.’
पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात
अलीकडेच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर देशात गंभीर आर्थिक संकट सुरू असल्याची कबुली दिली आहे. कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, कर्मचाऱ्यांना पगार देता येत नाही. महसूल संकलनात घट झाली असून परकीय कर्ज वाढत असल्याची कबुली त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. सर्बियन दूतावासाचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
Pakistan embassy expressed grief over not getting salary on Twitter, wrote – Sorry Imran, there was no option
महत्त्वाच्या बातम्या
- ओमीक्रोन व्हेरिएंट : कोल्हापूर मध्ये 15 ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यात आले
- पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा कंगना राणौतच्या ताफ्याला घेराव घातला, माफी मागितल्यानंतर हात हलवत सोडले
- WATCH : सावरकरांवर टीका, सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकार निशाणा
- आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी राहुल गांधी आक्रमक!!; सादर केली पंजाबची 403 शेतकऱ्यांची यादी
- NCB च्या प्रमुखांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं पत्र ; राज्यातली महत्त्वाची पाच ड्रग्ज प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्याचे अमित शाह यांचे आदेश
- तयारी बूस्टरची : 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोविड लसीचा बूस्टर डोस द्यावा, तज्ज्ञ शास्त्रज्ञांची शिफारस