• Download App
    PAK VS BAN : शाहिन आफ्रिदीचा राग ! षटकार खेचला म्हणून - बांगलादेशच्या फलंदाजाला चेंडू फेकून मारला |PAK VS BAN: Shahin Afridi's anger! As he hit a six, he threw the ball to the Bangladesh batsman

    PAK VS BAN : शाहिन आफ्रिदीचा राग ! षटकार खेचला म्हणून – बांगलादेशच्या फलंदाजाला चेंडू फेकून मारला

    बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना PAK VS BAN: Shahin Afridi’s anger! As he hit a six, he threw the ball to the Bangladesh batsman


    वृत्तसंस्था

    ढाका:पाकिस्तानला दुसर्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना यजमान बांगलादेश सोबत रडीचा डाव खेळला. २ बाद ५ अशी अवस्था बांगलादेशची झाली होती, परंतु नजमुल होसैन व आफिफ होसैन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. ही भागीदारी तोडण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीचा राग अनावर झाला.

    आफिफनं तिसऱ्या षटकात आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार खेचला, त्यामुळे चिडलेल्या आफ्रिदीनं आफिफला चेंडू चक्क फेकून मारला.

    तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आफिफनं षटकार खेचला. चौथा चेंडू आफिफनं बचावात्मक खेळला अन् तो आफ्रिदीच्या हातात गेला.

    पाकिस्तानी गोलंदाजानं आफिफ क्रिजवर असूनही चेंडू जोरात फेकला अन् तो बांगलादेशच्या फलंदाजाच्या पायावर आदळला.त्यानंतर आफिफ वेदनेनं जमिनीवर पडला.त्याची ही कृती लोकांना फार आवडली नाही. शादाब खाननं ९व्या षटकात आफिफला ( २०) बाद केले.पाकिस्ताननं हा सामना ४ विकेट्स व ४ चेंडू राखून जिंकला. शादाब २१ व नवाज १८ धावांवर नाबाद राहिला.

    PAK VS BAN: Shahin Afridi’s anger! As he hit a six, he threw the ball to the Bangladesh batsman

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न