• Download App
    जयपूर विमानतळावर लाहोरचे तिकीट काढताना तिकीट काढताना पाकिस्तानी मुलीला अटक!!Pak girl held at Jaipur Airport trying to book returning ticket without passport

    जयपूर विमानतळावर लाहोरचे तिकीट काढताना तिकीट काढताना पाकिस्तानी मुलीला अटक!!

    वृत्तसंस्था

    जयपूर : भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि पाकिस्तानात गेलेली भारतीय महिला अंजू राफाईल सध्या बातम्यांमध्ये चर्चेत असताना जयपूर विमानतळावर एका मूळ पाकिस्तानी मुलीला पोलिसांनी पकडले आहे. ही पाकिस्तानी मुलगी जयपूर विमानतळावर लाहोरला जाणाऱ्या विमानाचे तिकीट काढायला आली होती. Pak girl held at Jaipur Airport trying to book returning ticket without passport

    जयपूरहून थेट विमानच नाही

    वास्तविक जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट पाकिस्तानला जाणारे कुठलेच विमान सुटत नाही, तरी देखील ही मुलगी लाहोरला जाण्याचे तिकीट काढायला जयपूर विमानतळावर आली होती.

    गझल परवीन असे या 16 वर्षांच्या मुलीचे नाव असून ती राजस्थानातल्या सवाई माधोपूर मध्ये गेल्या 3 वर्षांपासून आपल्या आत्याच्या घरात राहत होती. पण आत्याशी भांडण झाल्यामुळे ती तिला न सांगता सवाई माधोपूर येथून निघून जयपूर विमानतळावर आली आणि तिने लाहोरचे तिकीट काढायचा प्रयत्न केला. पण तिच्याकडे तेव्हा पासपोर्ट नव्हता. त्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना पाचारण केले आणि त्या मुलीची माहिती दिली. आपण पाकिस्तानच्या नागरिक असल्याचे गझल परवीनने नंतर पोलिसांना सांगितले.

    सध्या महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये दहशतवादी संघटनांची संबंध असलेले अनेक जण पकडले जात आहेत. पाकिस्तानी हनी ट्रॅप मध्ये अडकलेले कुरुलकर प्रकरण ताजे आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी महिला सीमा हैदर भारतात आल्यानंतर निर्माण झालेली खळबळ आणि भारतीय महिला अंजू राफाईल पाकिस्तानात गेल्यानंतर निर्माण झालेली खळबळ आजही ताजी आहे.

    या पार्श्वभूमीवर गझल परवीन ही पाकिस्तानी मुलगी जयपूर विमानतळावर पकडली जाणे ही बाब अत्यंत गंभीर मानली गेली आहे. राजस्थान पोलीस आणि सीआयएसएफ तिची चौकशी करत आहेत. राजस्थान पोलिसांची एक तुकडी गझल परवीनच्या आत्याच्या शोधासाठी सवाई माधोपूरला देखील गेली आहे. गझल परवीन भारतात नेमकी किती वर्षे राहत होती?? तिची कनेक्शन्स कुठे कुठे जोडली गेली होती?? याविषयी आता कसून चौकशी सुरू झाली आहे.

    Pak girl held at Jaipur Airport trying to book returning ticket without passport

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य