• Download App
    दररोज 12 km चालत जाऊन लहान मुलांना आणि स्त्रियांना पुस्तके देणारी चालती बोलती लायब्ररी म्हणजे पी सुकुमारण | P Sukumaran is a walking library that provides books to children and women by walking 12 km daily

    दररोज १२ कि.मी. चालत जाऊन लहान मुलांना आणि स्त्रियांना पुस्तके देणारी चालती बोलती लायब्ररी म्हणजे पी सुकुमारण

    विशेष प्रतिनिधी

    अल्लापूजहा : पुस्तकही वाचलीच पाहिजेत. आपल्या विचारांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पुस्तकांचं वाचन करणं खूप गरजेचं आहे. आजकाल पुस्तकं वाचण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झालेले आहे. ऑडिओ बुक्समूळे हातात पुस्तक घेऊन वाचण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहे. केरळमध्ये राहणारे पी सुकुमारन नावाचे एक व्यक्ती मागील 41 वर्षांपासून दररोज जवळपास 12 किलोमीटर चालत जाऊन लोकांना पुस्तके देण्याचे काम करतात.

    P Sukumaran is a walking library that provides books to children and women by walking 12 km daily

    61 वर्षीय पी सुकुमारन केरळमधील लायब्ररी कुमारपूरम पब्लिक लायब्ररीमध्ये लायब्ररीयन म्हणून मागील 41 वर्षांपासून काम करत आहेत. 1979 साली त्यांनी येथे काम करण्यास सुरूवात केली होती. ही लायब्ररी त्यांच्या मोठ्या भावाचीच आहे. 2019 मध्ये आलेल्या पुरामध्ये यातील बरीच पुस्तके खराब झाली होती. त्यामुळे तिथल्या पुस्तकांची संख्या देखील कमी झाली होती.

    लहान मुलांनी आणि स्त्रियांनी पुस्तके वाचावीत म्हणून ते रोज सकाळी 8.30 वाजता लायब्ररीमध्ये आल्यानंतर 10.3० वाजता 60 ते 70 पुस्तके घेऊन चालत जाऊन लोकांच्या घराघरांत जाऊन पुस्तके देतात. अतिशय कौतुकास्पद काम ते करत आहेत.


    ‘अनैक लव्हिंग लायब्ररी’ : ९ वर्षीय अनैकने कोव्हिड पेशन्टचे एकटेपण दूर करण्यासाठी सुरू केली मिनी लायब्ररी


    रोज 12 किलोमीटर चालत जाऊन पुस्तके देण्याबद्दल सांगताना ते म्हणतात की, मला चालत जाणे आवडते. आजूबाजूला असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात चालत जाण्यामुळे एक उत्साह वाटतो. घरातील जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या विचारांपासून सुटका होते. त्यामुळे मी चालत जाण्यास प्राधान्य देतो कारण मला सायकलदेखील चालवता येत नाही.

    मागील 15 वर्षांपासून ते आपली पत्नी आणि मुलासोबत एका भाडय़ाच्या घरामध्ये राहतात. जेमतेम पगार आणि मुलाला ऑटिझम नावाच्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त पैसे हे त्याच्या उपचारावर खर्च केले जातात. जर तुम्हाला पी सुकुमारन यांना मदत करायची असेल तुम्ही खालील नंबरवर संपर्क करून त्यांना आर्थिक मदत देऊ शकता. 9747451348

    P Sukumaran is a walking library that provides books to children and women by walking 12 km daily

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!