विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात निवडणूक लढविणे आणि पक्षाची पुनर्बांधणी करणे ही दोन्ही कामे एकाचवेळी करू नका, असं पक्ष नेतृत्वाला सांगितलं होतं. पण, त्यांनी ऐकलं नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांच्यावर केली आहे.P. Chidambaram’s targeting of Priyanka Gandhi, rebuilding the party and saying don’t fight elections at the same time
चिदंबरम म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपवली होती. पण, निवडणूक प्रचार आणि पक्षाची पुनर्बांधणी या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करू असं त्या म्हणाल्या.
पण, आधी पक्षाची पुनर्बांधणी करावी. त्यानंतर उत्तप्रदेशात निवडणूक लढवावी, असं त्यांना सांगितलं होतं. पण, त्यांनी ऐकलं नाही. गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाची अवस्था गंभीर झाली हे सर्वांनाच माहिती आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसचा पराभव झाला.
उत्तर प्रदेशच्या प्रभारी लोकांनी एकाचवेळी दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आधी पक्षाची पुनर्बांधणी करायला पाहिजे होती. त्यानंतर निवडणूक लढविणे गरजेचे होते. पण, दुदैर्वाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाचवेळी झाली. काँग्रेसमध्ये अनेक कमतरता आहेत.
मी त्यांच्या निदर्शनास आणू दिल्या आहे. कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांसारख्या नेत्यांनी काही कमतरता निदर्शनास आणून दिल्या आहेत, असेही चिदंबरम यांनी सांगितले.काँग्रेसमधील काही बंडखोर नेत्यांची सातत्याने बैठक सुरू आहे.
त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. पण, पक्ष फुटू नये यासाठी चिदंबरम यांनी आवाहन केले आहे. प्रत्येकांनी आपआपल्या प्रदेशात जाऊन पक्षाची बांधणी करावी, असं आवाहन देखील चिदंबरम यांनी केले.
P. Chidambaram’s targeting of Priyanka Gandhi, rebuilding the party and saying don’t fight elections at the same time
महत्त्वाच्या बातम्या
- अमेठीत होळीच्या मारामारीत आठ जण जखमी दोघे मृत; दोन गंभीर जखमीं
- Congress Debacle : “आप” – तृणमूलची ज्युनिअर पार्टनर व्हायला काँग्रेस तयार; पी चिदंबरम यांची “ऑफर
- औरंगाबादचा मटका किंग आबेद पठाणचा नाना पटोले यांच्या हजेरीत काँग्रेसमध्ये प्रवेश!!
- Kolhapur Byelection