कॉँग्रेसमधील असंतुष्ठ गटाचे सहानुभूतीदार असलेल्या पी. चिदंबरम यांनी आता थेट पक्षाच्या धोरणाविरुध्द वकीली सुरू केली आहे. बंगाल कॉँग्रेसने काढलेल्या घोटाळ्यात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने चिदंबरम लढत आहेत. त्यामुळे कोलकत्ता येथे वकीलांनी त्यांच्या विरोधात घोेषणाबाजी करत काळे झेंडे दाखविले. P. Chidambaram against the Congress in Bengal. angry lawyers show black flags
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : कॉँग्रेसमधील असंतुष्ठ गटाचे सहानुभूतीदार असलेल्या पी. चिदंबरम यांनी आता थेट पक्षाच्या धोरणाविरुध्द वकीली सुरू केली आहे. बंगाल कॉँग्रेसने काढलेल्या घोटाळ्यात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने चिदंबरम लढत आहेत. त्यामुळे कोलकत्ता येथे वकीलांनी त्यांच्या विरोधात घोेषणाबाजी करत काळे झेंडे दाखविले.
काँग्रेस नेते पी. चिदंबरम हे प्रसिध्द वकील आहेत. मात्र, आता त्यांनी थेट पक्षाच्या भूमिकेविरोधात आपले वकीली ज्ञान द्यायला सुरूवात केली आहे. ते चिदंबरम हे क्व्हेंटर कंपनीच्या वतीनं कलकत्ता उच्च न्यायालयात हजर झाले होते. या कंपनीच्या शेअर खरेदीत झालेल्या घोटाळ्याबाबत पश्चिम बंगाल काँग्रेस सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहे. त्यामुळंच आता चिदंबरम यांना विरोध होत आहे. चिदंबरम हे काँग्रेस पक्षाच्या भावनांशी खेळत असल्याचा दावा आंदोलनकर्त्या वकिलांनी केलाय. कंपनीच्या वतीनं न्यायालयात हजर राहणं योग्य नसल्याचं पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर चौधरी यांनी म्हटले आहे.
या आंदोलनात सहभागी असलेले वकील कौस्तव बागची म्हणाले, माजी केंद्रीय अर्थमंत्री एका संस्थेच्या वतीनं हजर होत आहेत, ज्यांच्या शेअर्सच्या खरेदीवर पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आक्षेप घेत आहेत. चिदंबरम हे काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आहेत आणि एक अतिशय महत्वाचे नेतेही आहेत.
आम्ही हा निषेध काँग्रेस कार्यकर्ता म्हणून केलाय, वकील म्हणून नाही. काँग्रेसच्या वकिलांनी त्यांना तृणमूल काँग्रेसचा सहानुभूतीदारही म्हटलं होतं. त्याचवेळी काँग्रेसच्या वकिलांनी पश्चिम बंगालमधील पक्षाच्या खराब कामगिरीसाठी चिदंबरम यांना जबाबदार धरले आहे. पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध मेट्रो डेअरी प्रकरणात चिदंबरम पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात होते.
त्यामुळे चिदंबरम यांना कलकत्ता उच्च न्यायालयाबाहेर काही वकिलांच्या विरोधाला सामोरं जावे लागले. काही वकील संतप्त झाले आणि त्यांनी चिदंबरम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शिवाय, त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.
P. Chidambaram against the Congress in Bengal. angry lawyers show black flags
महत्वाच्या बातम्या