• Download App
    ओवेसींचा सीएए, एनआरसी कायदे रद्द करण्यासाठी विषारी इशारा, अन्यथा आणखी एक शाहीन बाग|Owesi'stoxic warning to repeal CAA, , NRC legislation, otherwise another shaheen garden

    ओवेसींचा सीएए, एनआरसी कायदे रद्द करण्यासाठी विषारी इशारा, अन्यथा आणखी एक शाहीन बाग

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने कृषी कायद्यांप्रमाणेच आता सीएए आणि एनआरसी कायदे रद्द केले नाही तर बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवू, असा इशारा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी केले आहे.Owesi’stoxic warning to repeal CAA, , NRC legislation, otherwise another shaheen garden

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील शुक्रवारी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. आता ओवैसी यांनीही उत्तरप्रदेशच्या बाराबंकी येथे केंद्र सरकारला लक्ष्य केले. आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपाला कृषी कायद्याप्रमाणेच सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा), एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर), एनआरसी (राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर) मागे घेण्याचे आवाहन करीत आहो.



    कारण, ते सर्व भारतीय घटनेच्या विरोधात आहे. सरकारने हे कायदे रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून आणखी एका शाहीन बागेसारखा प्रकार घडेल, असेही ओवैसींनी म्हटले आहे.

    शाहीन बागेत गेल्या वर्षी 15 डिसेंबरपासूनच सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात आंदोलन झाले होते. मात्र, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन उठविण्यात आले होते.

    Owesi’stoxic warning to repeal CAA, , NRC legislation, otherwise another shaheen garden

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य