एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, असे सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका आवाजात म्हटले आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही या घटनेचा निषेध केला असून केवळ अतार्किक कट्टरपंथीयांनाच खासदार ओवैसींची हत्या करायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे. ओवैसी हे भलेही राष्ट्रवादी नसतील, पण ते देशभक्त आहेत, असं ट्विट स्वामी यांनी केलं आहे. Owaisi may not be a nationalist, but he is a patriot, says BJP MP Subramaniam Swamy
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, असे सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका आवाजात म्हटले आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही या घटनेचा निषेध केला असून केवळ अतार्किक कट्टरपंथीयांनाच खासदार ओवैसींची हत्या करायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे. ओवैसी हे भलेही राष्ट्रवादी नसतील, पण ते देशभक्त आहेत, असं ट्विट स्वामी यांनी केलं आहे.
‘ओवैसी राष्ट्रवादी नसले तरी ते देशभक्त आहेत’
आपल्या विधानांमुळे आणि युक्तिवादामुळे चर्चेत असलेले भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, तर्काच्या परंपरेवर विश्वास नसणाऱ्या कट्टरपंथीयांनाच खासदार ओवैसी यांची हत्या करायची आहे. ओवैसी भलेही राष्ट्रवादी नसतील, पण ते देशभक्त आहेत. फरक एवढाच आहे की ओवैसी आपल्या देशाचे रक्षण करतील पण हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे यावर त्यांचा विश्वास नाही. आपण त्यांच्या स्पष्ट युक्तिवादांना सामोरे जावे आणि लोकांना रानटीपणावर उतरू देऊ नये.”
‘ओवैसी पूर्वजांना हिंदू मानत नाहीत’
सुब्रमण्यम स्वामी यांनी ओवेसींबाबत यापूर्वीच हे मत मांडले आहे. 2016 मध्ये ते म्हणाले होते की ओवैसी हे देशभक्त आहेत, कारण ते परदेशात भारताचे रक्षण करतात. तथापि ते राष्ट्रवादी नाहीत कारण ते आपल्या पूर्वजांना हिंदू मानत नाहीत.
गुरुवारी संध्याकाळी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दावा केला होता की, उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रचारादरम्यान मेरठहून परतत असताना त्यांच्या कारवर छिजारसी टोल प्लाझा येथे 4 राउंड गोळीबार करण्यात आला होता. ओवेसी म्हणाले होते की, मेरठहून परतत असताना आपल्यावर गोळीबार करण्यात आला.
याप्रकरणी तत्काळ कारवाई करत यूपी पोलिसांनी सचिन पंडित आणि शुभम या दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांनाही शुक्रवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ओवैसी यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही आरोपी संतप्त झाल्याचे यूपी पोलिसांनी म्हटले आहे. दोन्ही आरोपी ओवैसींच्या मागे लागले होते.
ओवैसींनी सरकारने सुरक्षा नाकारली
या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ओवैसींना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे, मात्र ओवैसींनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. आरोपींवर यूएपीए लादण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
Owaisi may not be a nationalist, but he is a patriot, says BJP MP Subramaniam Swamy
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात चोवीस तासांत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; बाधित रुग्णांची संख्या गेली दोन हजारांवर
- भारतात राजस्थानात सापडली सोन्याची खाण; भिलावडा येथे सोन्यासह, तांब्याचे विपूल साठे
- फास्टॅगला आता बायबाय ; जीपीएसद्वारे टोल कापण्याची नवी प्रणाली लागू होणार
- श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पोलिसांची कारवाई, पिस्तुलासह आक्षेपार्ह साहित्य केले जप्त