विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये सरकारी दुर्लक्षामुळे लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. खगरियामध्ये एका तरुणाच्या खात्यात साडेपाच लाख रुपये येण्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 960 कोटी रुपये आले आहेत. दोन बँक खात्यांमध्ये 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम पाहिल्यानंतर बँक अधिकारीसुद्धा बुचकळ्यात पडले आहेत.Over 900 Crore Deposited In Bank Accounts Of 2 Boys In Bihar
सरकारी कर्मचारी किंवा बँक अधिकार्यांच्या निष्काळजीपणानंतर आता लोक त्यांचे खाते तपासण्यासाठी बँक किंवा CSP केंद्र गाठत आहेत. बँका आणि सीएसपी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे पैसे त्यांच्या खात्यात आल्याची शक्यता काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही जण आवई उठवत आहेत की, 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती, यामुळे आता त्यांच्या खात्यात पैसे मिळत आहेत.
गणवेशाचे पैसे मुलांच्या खात्यात
दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पास्टिया गावातील रहिवासी आहेत. वास्तविक, बिहारमधील शालेय विद्यार्थ्यांना हा पैसा थेट मुलांच्या बँक खात्यात येतो. खात्यातील कपड्यांच्या रकमेची चौकशी करण्यासाठी गुरुचंद्र विश्वास आणि असित कुमार यांनी सीएसपी केंद्र गाठले. इथे दोघांना कळले की, कोट्यवधी रुपये खात्यांमध्ये जमा आहेत.
हे ऐकून मुलांना धक्का बसला आणि तिथे उपस्थित इतरांनाही धक्का बसला. विद्यार्थी असित कुमार – 1008151030208001 क्रमांकाच्या खात्यात 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. गुरुचंद्र विश्वासच्या – 1008151030208081 क्रमांकाच्या 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहेत. दोन्ही खाती उत्तर बिहार ग्रामीण बँक भेलागंज शाखेची आहेत.
ग्रामीण बँकेच्या भेलागंजचे शाखा व्यवस्थापक मनोज गुप्तादेखील मुलांच्या खात्यातील जमा पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी दोन्ही मुलांच्या खात्यातून लगेच पैसे काढणे बंद केले आणि खाती गोठवताना ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Over 900 Crore Deposited In Bank Accounts Of 2 Boys In Bihar
महत्त्वाच्या बातम्या
- Sonu Sood : सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयावर आज दुसऱ्या दिवशीही प्राप्तिकर विभागाची कारवाई, काल 20 तास सुरू होता तपास
- भूपेंद्र पटेलांनी बदलले अख्खे कॅबिनेट; पण यात कोणतेही “रॉकेट सायन्स” नाही, हे तर मोदींचे जुनेच धक्कातंत्र!!
- संरक्षण कार्यालय संकुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाच्या नवीन संसद भवनाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होईल!
- 775 कोटी रुपयांची संरक्षण मंत्रालयाची दोन कार्यालये तयार, झोपड्यांत काम करणाऱ्या 7,000 कर्मचाऱ्यांना मिळाले नवे ऑफिस