विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी धर्माचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने यंदाची निवडणूक सामाजिक न्यायाच्या मुद्यावर लढविण्याचे ठरविले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत दलीत आणि ओबीसींना ६८ टक्के तिकिटे देण्यात आली आहेत.Opposition stuck in politics of religions, BJP in Uttar Pradesh working for social justice
उत्तर प्रदेशातील स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासारखे ओबीसी नेते भाजपला सोडून गेले आहेत. मात्र, ओबीसी आणि दलीतांना आपल्यापासून दूर जाऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरविले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत भाजपने 107 जणांना तिकिटे दिली आहेत.
यामध्येओबीसी, दलित आणि महिला उमेदवारांना 68 टक्के तिकिटे दिली आहेत. भाजपने सर्वसाधारण जागेवरही दलित उमेदवारांना तिकीट दिले आहे.भाजपने 83 विद्यमान आमदारांपैकी 63 उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 20 उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.
यात 107 उमेदवारांपैकी 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिला उमेदवार आहेत. त्याचवेळी 43 जागांवर सर्वसाधारण प्रवगार्चे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. याशिवाय एका सर्वसाधारण जागेवरून 1 अनुसूचित जातीच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे.
Opposition stuck in politics of religions, BJP in Uttar Pradesh working for social justice
महत्त्वाच्या बातम्या
- मित्रांनीच वाढविली अखिलेश यादव यांची डोकेदुखी, जागावाटपाचा फैैसला होईना
- पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरने केली पाच कोटी रुपयांची संपत्ती दान
- शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दर वेळेला पवारांची “उंची” का सांगावी लागते??
- पवारांची उंची आणि राष्ट्रीय राजकारणाचे स्थान लक्षात घेऊन नव्या पिढीने बोलावे; फडणवीसांना अजितदादांचे प्रत्युत्तर!!