• Download App
    काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी बोलावली विरोधकांची बैठक, अदानी प्रकरणावर रणनीतीवर तयार करणार|Opposition meeting called by Congress president Kharge to prepare strategy on Adani case

    काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी बोलावली विरोधकांची बैठक, अदानी प्रकरणावर रणनीतीवर तयार करणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी समविचारी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेतील खर्गे यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत हिंडेनबर्ग रिसर्च आणि अदानी मुद्द्यावरून संसदेत सरकारला घेरण्याची रणनीती तयार करण्याची चर्चा अपेक्षित आहे.Opposition meeting called by Congress president Kharge to prepare strategy on Adani case



    सोमवारी राज्यसभेत विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांनी शुक्रवारी अदानी समूहाच्या व्यवसायाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या त्यांच्या पक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

    माध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, अदानी घोटाळ्याची चौकशी व्हायला का नको? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अदानींच्या व्यवसायात गुंतवलेल्या पैशावर चर्चा व्हायला नको का? आम्ही जेपीसीच्या मागणीवर ठाम आहोत.

    Opposition meeting called by Congress president Kharge to prepare strategy on Adani case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले