• Download App
    विरोधकांकडे खरे मुद्दे नसल्याने गैरलागू मुद्द्यांवर वाद पेटवला; जनरल व्ही. के. सिंहांचा हल्लाबोल Opponents argued on inappropriate issues as they did not have real issues

    अग्निपथ योजना : विरोधकांकडे खरे मुद्दे नसल्याने गैरलागू मुद्द्यांवर वाद पेटवला; जनरल व्ही. के. सिंहांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सैन्य भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेत काहीही आक्षेपार्ह नाही. पण, विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे या योजनेवरून नाहक वाद पेटवला जात असल्याचे शरसंधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी साधले आहे. अग्निपथ योजनेवरील सर्व आक्षेप त्यांनी एकापाठोपाठ एक खोडून काढले Opponents argued on inappropriate issues as they did not have real issues

    कमी प्रशिक्षण मिळणार हा मुद्दा चुकीचा

    यासंदर्भात भाष्य करताना जनरल व्ही. के. सिंह म्हणाले की, भारतीय सैन्य हे रोजगाराचे साधन नाही. सैन्यात दाखल होण्याच्या अटीशर्ती असतात. तशाच अटी अग्निपथ योजनेत आहेत. हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांनी अग्निवीरांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अग्निपथ योजनेत 4 वर्षानंतरच्या सेवेनंतर निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यानंतर रोजगाराचे काय असा मुद्दा आंदोलकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

    भारतीय सैन्यात 4 वर्षांची सेवा बजावून निवृत्त झालेल्या तरुणांची मानसिकता चुकीच्या गोष्टींकडे वळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेत जवानांना कमी कालावधीचे प्रशिक्षण मिळणार असल्याचा दावा खोडून काढला. प्रशिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून सैन्यात प्रशिक्षण कधीच थांबत नाही. त्यामुळे जवानांना कमी कालावधीचे प्रशिक्षण मिळेल हा मुद्दा चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. लष्कराच्या तुकडीत दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशिक्षण सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

    – वयोमर्यादा बदलली

    केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत सैन्य भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्ष ठेवली आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा 21 वर्ष होती. गेल्या 2 वर्षांत एकही भरती झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. वयोमर्यादेत असलेली ही सवलत यंदाच्या पहिल्या भरतीसाठीच लागू असणार आहे, या महत्त्वाच्या मुद्याकडेही जनरल व्ही. के. सिंह यांनी लक्ष वेधले आहे.

    Opponents argued on inappropriate issues as they did not have real issues

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य