• Download App
    Oppo कंपनी महसूल गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर!!; 4,389 कोटींचे सीमाशुल्क बुडविले!! Oppo company on the radar of revenue intelligence system

    Oppo कंपनी महसूल गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर!!; 4,389 कोटींचे सीमाशुल्क बुडविले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने चिनी मोबाईल कंपन्यांच्या बेकायदेशीर व्यवहाराच्या मुद्द्यांवर त्यांच्या नाड्या आवळल्या आहेत. Oppo company on the radar of revenue intelligence system

    डीआरआय (DRI) अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या OPPO कंपनीशी संबंधित चौकशीत या कंपनीने सुमारे 4,389 कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडविल्याचे उघडकीस आले आहे. ओप्पो इंडिया ही कंपनी भारतात मोबाईल फोन आणि फोनशी संबंधित इतर वस्तूंचे उत्पादनांची विक्री करते.

    चुकीच्या पद्धतीने 2981 कोटींची कर सवलत

    अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ओप्पो मोबाइल हे Oppo India च्या नावाने ओळखले जातात. Oppo India विरोधात DRI कडून चौकशी सुरू होती. यामध्ये 4389 कोटींची करचोरी समोर आली आहे. या तपासादरम्यान DRI ने ओप्पो इंडियाचे कार्यालय आणि व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या काही प्रमुख व्यक्तींच्या घराची झडती घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तऐवज सापडले आहेत. या माहितीच्या आधारे ओप्पो इंडियाला चुकीच्या पद्धतीने 2981 कोटींच्या कराची सवलत मिळाली. DRI ने केलेल्या चौकशीत कस्टम अधिकाऱ्यांना आयात दरम्यान ओप्पोने चुकीची माहिती दिली असल्याचेही समोर आले आहे.

    4,389 कोटी रुपयांचे सीमाशुल्क चुकवले

    चौकशीअंती, महसूल गुप्तचर विभागाने ओप्पो इंडिया कंपनीला करणे दाखवा नोटीस जारी केली असून त्यात 4,389 कोटी रुपयांचे सीमाशुल्क भरण्याचा आदेश दिला आहे. तसेच या नोटिशीद्वारे ओप्पो इंडिया कंपनीचे कर्मचारी तसेच ओप्पो चीन या कंपनीला सीमा शुल्क कायदा, 1962 अन्वये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला आहे.

    Oppo company on the radar of revenue intelligence system

    Related posts

    Lok Sabha : लोकसभा अध्यक्ष बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला; शहा म्हणाले- डोळा मारणारे अध्यक्षांवर प्रश्न उपस्थित करताहेत

    Assam Govt : आसाममध्ये 40 लाख महिलांच्या खात्यात ₹9000 हस्तांतरित; 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले- निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही

    CBSE Class : CBSEच्या 12वीच्या पेपरवर गाण्याचा क्यूआर कोड; स्कॅन केल्यावर यू-ट्यूब लिंक उघडत आहे, CBSE ने म्हटले- चूक झाली, पण पेपर सुरक्षित