• Download App
    केंद्रीय गृहमंत्रालयात 50 टक्केच उपस्थिती ; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना |Only 50 per cent attendance at the Union Home Ministry;Measures to prevent corona infection

    केंद्रीय गृहमंत्रालयात 50 टक्केच उपस्थिती ; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने कनिष्ठ सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी दिली असून उर्वरित 50 टक्के कर्मचाऱ्याना कार्यालयात हजर राहून काम करण्यास सांगितले.Only 50 per cent attendance at the Union Home Ministry;Measures to prevent corona infection

    दरम्यान, दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन हतबल झाले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे.


    कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा मोठा धोका ; तज्ज्ञाचा इशारा


    • कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी काही सूचना केल्या आहेत. त्यात सकाळी 9 ते 10 ही कामावर येण्याची वेळ आहे. या दरम्यान कर्मचारी स्वतंत्र वेळी येऊ शकतील. त्याच प्रमाणे कार्यालय सुटण्याची वेळ ठरवा. कंटेन्मेंट झोनमधील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्याची गरज नाही. कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू नये, यासाठी या उपाययोजना केल्याचे सांगितले.

    Only 50 per cent attendance at the Union Home Ministry;Measures to prevent corona infection

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!