• Download App
    पहिल्यांदाच ऑनलाईन जनगणना; लाभ पोहोचवण्यातही अचूकता; अमित शहांची घोषणा!! Online census for the first time

    Census : देशात पहिल्यांदाच ऑनलाईन जनगणना; लाभ पोहोचवण्यातही अचूकता; अमित शहांची घोषणा!!

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : देशाचा सरकारी कारभार अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. देशातील नागरिकांची मोजणी करण्यासाठी करण्यात येणारी जनगणनासुद्धा आता डिजिटल पद्धतीने करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आगामी जनगणना ही ई-जनगणना असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. यामुळे जनगणना अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक होण्यास मदत होईल. तसेच सरकारी योजनांचा लाभ देताना देखील तो योग्य व्यक्तीपर्यंत अचूक पोहोचेल, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. Online census for the first time

    गुवाहटीमधील अमीगाव येथे जनगणना केंद्राचे उद्घाटन करताना शहा यांनी ही घोषणा केली आहे. या ई-जनगणनेचे अनेक फायदे असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. ई-जनगणनेनुसार नोंदणी झाल्यामुळे व्यक्तीची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपोआपच त्याचे नाव मतदार यादीत जोडण्यात येणार आहे.तसेच व्यक्तीला आपले नाव आणि पत्ता बदलणे देखील सोपे होणार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.

     ई जनगणनेचे फायदे

    •  ई-जनगणनेमुळे जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीला देखील जनगणनेसोबत जोडण्यात येणार आहे.
    •  यामुळे जन्म झालेल्या व्यक्तीचे नाव आपोआप जनगणनेच्या यादीत समाविष्ट होईल.
    •  तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नाव या यादीतून वगळण्यात येईल. यामुळे भारताची जनगणना सातत्याने अपडेट आणि अद्ययावत होत राहील.
    •  आगामी जनगणना ही येणा-या 25 वर्षांच्या धोरणांना आकार देणारी असेल, असे शहा यांनी म्हटले आहे. या ई-जनगणनेचे सॉफ्टवेअर लाँच होताच मी आणि माझं कुटुंब सर्वप्रथम ऑनलाईन तपशील भरणार असल्याची माहितीही अमित शहा यांनी दिली आहे.

    Online census for the first time

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक