• Download App
    कर्ज नाकारल्याने एकाने चक्क बँकच पेटविली; कर्नाटकातील घटना, लाखो रुपयांचे नुकसान। One of them set the bank on fire for refusing a loan; Incidents in Karnataka, loss of millions of rupees

    कर्ज नाकारल्याने एकाने चक्क बँकच पेटविली; कर्नाटकातील घटना, लाखो रुपयांचे नुकसान

    वृत्तसंस्था

    बंगळूर : कर्ज नाकारल्याने एकाने चक्क बँकच पेटविल्याची घटना कर्नाटक राज्यात घडली असून त्यात बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
    कर्नाटकातील हवेरी तालुक्यात ही घटना घडली आहे. एकाने बँकेत कर्ज मिळविण्यासाठी अर्ज केला होता. पण, तो नामंजूर केला. त्यामुळे नाराज झालेल्या व्यक्तीने बँकेलाच आग लावून दिली. या प्रकरणी त्याच्याविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. One of them set the bank on fire for refusing a loan; Incidents in Karnataka, loss of millions of rupees

    पोलिसांनी सांगितले की, आरोपीने बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. परंतु कागदपत्रांच्या छाननी नंतर त्याचा अर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांनी नामंजूर केला. त्यामुळे निराश आणि संतप्त झालेल्या व्यक्तीने बँकेला आग लावली.



    राठ्ठीहल्ली येथील हजरत साब मुल्ला ( वय ३३), असे आरोपीचे नाव आहे. त्याने कॅनरा बँकेच्या हेलिडगोंडा येथील शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. तो नामंजूर झाल्याने मुल्ला याने शनिवारी रात्री खडकीची काच फोडून बँकेत पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत कॅश काउंटर, केबिन, सीसीटीव्ही, पाच कॉम्प्युटर, पासबुक प्रिंटर, स्कॅनर, पैसे मोजणारे मशीन आदी इलेक्ट्रिक वस्तू, असे मिळून १२ लाखांचे नुकसान झाले आहे.

    One of them set the bank on fire for refusing a loan; Incidents in Karnataka, loss of millions of rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’