• Download App
    आदिवासी समुदायाच्या परंपरेविरुध्द झाडे तोडतो म्हणून एकाची जमावाकडून दगडाने ठेचून हत्या|One is stoned to death by a mob for cutting down trees against the tradition of the tribal community

    आदिवासी समुदायाच्या परंपरेविरुध्द झाडे तोडतो म्हणून एकाची जमावाकडून दगडाने ठेचून हत्या

    विशेष प्रतिनिधी

    रांची: आदिवासी समुदायाच्या परंपरेविरुध्द जंगलातील झाडे तोडून तस्करी केल्याच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीची दगडांनी ठेचून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकला. झारखंडमध्ये हा अमानुष प्रकार घडला.One is stoned to death by a mob for cutting down trees against the tradition of the tribal community

    संजू प्रधान (३२) याला जमावाने घराबाहेर बोलावले आणि बेसराजरा बाजारजवळ असलेल्या त्याच्या घरापासून १०० मीटर दूर त्याची दगडाने ठेचून हत्या केली. नंतर जमावाने लाकडे गोळा करून त्याचा मृतदेह आगीच्या हवाली केल. नंतर पोलिसांनी त्याचा जळालेला मृतदेह ताब्यात घेतला.



    घटनास्थळी जमलेल्या गावकºयांचा आरोप आहे की, अनेकदा बजावूनही संजू प्रधान जंगलातील झाडे तोडून लाकडांची तस्करी करायचा. त्याचे हे कृत्य आदिवासी समुदायाच्या परंपरेविरुद्ध होते. सरपंच सुबान बुध यांनी सांगितले की, संजू प्रधान अवैधपणे झाडे तोडायचा. याबाबत वनविभागालाही कळविले होते;

    परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. झाडे तोडण्यात सहभाग असल्याचा प्रधानने इन्कार केल्याने लोक चिडले होते. जाब विचारण्यासाठी लोकांनी त्याला घराबाहेर बोलावले. नंतर जमावाने दगडाने त्याला मारहाण केली.

    त्याची आई आणि पत्नी जमावाला गयावया करीत होती; परंतु कोणालाही दया आली नाही. दगडाच्या माऱ्याने तो अर्धमेला झाला होता. जमावाने त्याच्या घराजवळच पडलेल्या लाकडांची चिता रचून त्याचा मृतदेह आगीच्या हवाली केला.

    One is stoned to death by a mob for cutting down trees against the tradition of the tribal community

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो