• Download App
    केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह विषाणूचा शिरकाव, कोझीकोडला मुलाच्या मृत्युमुळे खळबळ । One boy died due to nipah in kerala

    केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह विषाणूचा शिरकाव, कोझीकोडला मुलाच्या मृत्युमुळे खळबळ

    वृत्तसंस्था

    कोझिकोड : केरळमध्ये कोझिकोडमधील एका रुग्णालयात बारावर्षीय मुलाला निपाह विषाणुमुळे मृत्यू झाला आहे. या मुलाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविले होते. संस्थेने नमुन्यात निपाह विषाणू असल्याचा अहवाल दिला. One boy died due to nipah in kerala

    मुलाच्या सर्वांत नजीकच्या संपर्कातील २० व्यक्तींपैकी दोघांमध्ये निपाह विषाणुची लक्षणे आढळली आहेत. हे दोघेही आरोग्य कर्मचारी आहेत. त्यापैकी एकजण खाजगी रुग्णालयातील आहे. दुसरा कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काम करतो. आतापर्यंत मुलाच्या संपर्कातील १८८ जणांचा शोध घेण्यात आला आहे.



    मुलाच्या प्लाझमा, सीएसएफ व सिरम या नमुन्यांत निपाहचा संसर्ग आढळला. आदल्याच दिवशी नमुने तपासणीसाठी पाठविले होते. चार दिवसांपूर्वी मुलाला अतितापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्ही मुलाच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधासाठी विविध पथके तयार केली आहेत. या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

    One boy died due to nipah in kerala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त संवाद हटवणार

    Kartavya Bhavan : कर्तव्य भवनामुळे वाचणार वार्षिक 1500 कोटी भाडे, पंतप्रधान मोदी म्हणाले- कोट्यवधींची स्वप्ने सत्यात उतरतील

    7 फुटांपर्यंत कागदपत्रांचा ढिग दाखवून राहुल गांधींनी केले आरोप; पण निवडणूक आयोगाने मागितले फक्त सहीचे प्रतिज्ञापत्र!!