• Download App
    On the second day of Vajpayee Jayanti, Rahul Gandhi paid tribute to Atal Samadhi

    वाजपेयी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधींची अटल समाधी स्थळी जाऊन श्रद्धांजली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वाजपेयी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी अटल समाधी स्थळी आज 26 डिसेंबर 2022 रोजी जाऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. On the second day of Vajpayee Jayanti, Rahul Gandhi paid tribute to Atal Samadhi

    अटल बिहारी वाजपेयी यांची 25 डिसेंबर रोजी जयंती होती. काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी अटल समाधी स्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली होती. मात्र, आज सकाळी राहुल गांधींनी अटल समाधीस्थळी पाशी येऊन श्रद्धांजली अर्पण केली.

    भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी सध्या राजधानी दिल्लीत आहेत. दोन दिवस त्यांची भारत जोडो यात्रा दिल्ली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरली. राहुल गांधींचे या यात्रेतच लाल किल्ल्यावरून भाषण झाले. काँग्रेसने भारत जोडो यात्रेत कधीही नफरत आणि हिंसा फैलावली नाही याचे उदाहरण देताना राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत गाय, म्हैस, कुत्री, डुकरं सगळे आले. पण कोणीही त्यांना मारले नसल्याचे उदाहरण दिले होते.

    On the second day of Vajpayee Jayanti, Rahul Gandhi paid tribute to Atal Samadhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज