• Download App
    एकीकडे काँग्रेस प्रवेशाचा आव; दुसरीकडे केसीआरशी हातमिळवणीचा डाव!! On the one hand, the pretense of joining the Congress; On the other hand, the innings of handshake with KCR

    Prashant Kishor : एकीकडे काँग्रेस प्रवेशाचा आव; दुसरीकडे केसीआरशी हातमिळवणीचा डाव!!

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याने एकीकडे काँग्रेस प्रवेशाचा आव आणला असला तरी एकापेक्षा अनेक डगरींवर हात ठेवण्याचा डाव मात्र अजून आवरलेला दिसत नाही किंबहुना आधीच तृणमूल काँग्रेसची आतून संधान वाढलेल्या प्रशांत किशोरने आता नव्याने तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्याशी हातमिळवणीचा डाव असल्याचे दिसून येत आहे. On the one hand, the pretense of joining the Congress; On the other hand, the innings of handshake with KCR

    काल शनिवार आणि आज रविवार या दोन दिवसात प्रशांत किशोर आणि के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण मधील राजकीय परिस्थितीवर आणि तेलंगण राष्ट्र समितीचे निवडणूक रणनीतीवर चर्चेचा बैठकांचे चक्र सुरू आहे. त्यामध्ये तेलंगण राष्ट्र समितीचे अतिवरिष्ठ एक-दोन नेते वगळता बाकी कोणीही उपस्थित देखील नाही. त्यामुळेच प्रशांत किशोरच्या काँग्रेस प्रवेश याविषयी तसेच एकाच वेळी काँग्रेस प्रवेशाचा आव आणि दुसरीकडे कट्टर काँग्रेस विरोधक असणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्याशी हातमिळवणीचा डाव…!! अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    – निवडणूक रणनीतीच्या मर्यादा

    प्रशांत किशोरला निवडणूक रणनीतीकार म्हणून मिडीयाने कितीही उचलून धरला असला तरी रणनीतीकार म्हणूनच त्याच्या मर्यादा स्पष्ट देखील झाल्या आहेत. जेथे विजयाची शक्यता 50 % पेक्षा अधिक आहे, त्याच पक्षाशी हातमिळवणी करून विविध प्रदेशांमध्ये प्रशांत किशोर निवडणूक रणनीतीकार म्हणून नाव कमावले आहे. पण पराभूत असलेल्या पक्षाला विजयापर्यंत खेचून येण्याचे रणनीतीचे कौशल्य प्रशांत किशोरला दाखवता आले नाही…!! याचे सर्वात मोठे उदाहरण उत्तर प्रदेश काँग्रेसचे आहे. तरीदेखील सध्या प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या बातम्या विविध बैठकांमुळे समोर आले आहे.

    – केसीआर कट्टर काँग्रेस विरोधकही

    खुद्द सोनिया गांधींशी प्रशांत किशोरने याबाबत गंभीर चर्चा केली आहे. सुमारे 600 स्‍लाईड्समध्‍ये काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा प्लॅन त्यांना दाखवला आहे. त्यावर काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे. पण हे मंथन सुरू असतानाच प्रशांत किशोर दुसऱ्या डगरीवर पाय ठेवण्यासाठी तेलंगणमध्ये पोहोचला आहे. केसीआर चंद्रशेखर राव यांच्याशी हातमिळवणी करून प्रशांत किशोर एक प्रकारे काँग्रेस हायकमांड वर दबाव आणत असल्याची देखील चर्चा आहे. केसीआर कट्टर भाजपविरोधी खरे त्यातही तेलंगणावर वर्चस्वाची धार कायम ठेवून केंद्रात भाजप विरोधी आघाडी मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. पण त्याच वेळी तेलंगण मधला राजकीय संघर्ष हा काँग्रेस विरोधात असल्याची बाबही नजरेआड करता येणार नाही. त्यातही राहुल गांधींनी तेलंगण प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना कोणत्याही स्थितीत केसीआर बरोबर युती किंवा आघाडी करायची नाही तर संघर्ष करायचा असा आदेश देऊन ठेवला आहे. राहुल गांधी लवकरच तेलंगण दौऱ्यावर येऊन मोठ्या रॅल्या करणार आहेत.

    अशा पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर तेलंगणमध्ये दाखल होतो. केसीआर बरोबर 2 दिवस प्रगती भवन मध्ये चर्चा करूधमन मुक्काम करतो याचा नेमका अर्थ काय काढायचा…?? प्रशांत किशोर खरंच काँग्रेससाठी काम करणार की ममता बॅनर्जी, केसीआर यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांबरोबर काम करून काँग्रेसला झुलवत ठेवणार…?? हा महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे…!! निवडणूक रणनीतीकार म्हणून देखील मर्यादा असणाऱ्या प्रशांत किशोरची ही खेळी काँग्रेस ओळखणार की केसीआर ओळखून त्याला बाजूला टाकणार…??, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे…!! याची झलक प्रशांत किशोरला बिहार मध्ये मिळाली आहे. बिहार मध्ये नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाचा दलाची सगळी बागडोर आपल्या हातात खेचून घेण्याचा प्रशांत किशोरचा डाव स्वतः नितीशकुमारांनी आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी उधळून लावल्यानंतर प्रशांत किशोरला संयुक्त जनता दल यातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. हा फार जुना इतिहास नाही.

    – काँग्रेस प्रवेश होणार की नाही??

    आता देखील प्रशांत किशोर एकीकडे काँग्रेस प्रवेशाचा आव आणत असताना दुसरीकडे जर काँग्रेसचे कट्टर विरोधक केसीआर यांच्याशी संधान साधत असेल तर काँग्रेसच्या भवितव्याचे काय व्हायचे ते होवो… प्रशांत किशोरचे भवितव्य काँग्रेसच्या प्रवेश होण्याच्या आतच काँग्रेसच्या दृष्टीने आटोपलेले असेल हे निश्चित…!!

    On the one hand, the pretense of joining the Congress; On the other hand, the innings of handshake with KCR

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य