प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, 28 मे रोजी नवीन संसद भवनासमोर महिला महापंचायत घेण्याचे पहिलवानांनी ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत.On May 28, there will be a ‘riot’ in front of the new parliament building! Wrestlers will take the Women’s Maha Panchayat
मंगळवारी (23 मे) आंदोलक कुस्तीपटूंनी न्यायाच्या मागणीसाठी जंतरमंतर ते इंडिया गेट असा मोर्चा काढला. या मोर्चानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने पत्रकारांना सांगितले की, “आम्ही 28 मार्च रोजी नवीन संसद भवनासमोर शांततापूर्ण महिला महापंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.”
महापंचायतीचे नेतृत्व महिला करतील
या महापंचायतीचे नेतृत्व महिलाच करणार असल्याचे विनेश फोगटने सांगितले. यासोबतच उठवलेला हा आवाज दूरवर जायला हवा, असेही ती म्हणाली. आज देशाच्या मुलींना न्याय मिळाला तर येणार्या पिढ्या हिंमत दाखवतील.
विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक आघाडीचे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
बृजभूषण यांच्याविरुद्ध दोन एफआयआर
महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर 28 एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सिंहविरुद्ध पॉस्को अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, तर अन्य कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. दरम्यान, कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे सर्व उपक्रम स्थगित केले आहेत.
On May 28, there will be a ‘riot’ in front of the new parliament building! Wrestlers will take the Women’s Maha Panchayat
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची चिन्ह; TMC-CPI ने केली घोषणा
- पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत वक्तव्यावरून केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, गुजरात कोर्टाने जारी केले समन्स
- राहुल गांधींनी नवीन पासपोर्टसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा, एनओसी देण्याची केली विनंती
- सावरकर पोर्ट्रेट ते सावरकर जयंती दिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन; लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या विरोधकांच्या बहिष्काराचा असहिष्णू पायंडा!!