• Download App
    ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रा यांना परम विशिष्ट सेवा पदक, ३८४ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर|Olympic gold medalist Neeraj Chopra awarded Distinguished Service Medal, 384 gallantry awards

    ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रा यांना परम विशिष्ट सेवा पदक, ३८४ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारे स्टार खेळाडू नीरज चोप्रा यांना आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. याच यादीत नीरज चोप्रांनाही स्थान मिळाले आहे.Olympic gold medalist Neeraj Chopra awarded Distinguished Service Medal, 384 gallantry awards


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारे स्टार खेळाडू नीरज चोप्रा यांना आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. याच यादीत नीरज चोप्रांनाही स्थान मिळाले आहे.

    ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ३८४ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 12 शौर्य चक्र, 29 परम विशिष्ट सेवा पदके, 4 उत्तम युद्ध सेवा पदके, 53 अति विशिष्ट सेवा पदके, 13 युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे. याशिवाय 122 विशिष्ट सेवा पदक, 81 सेना पदक (शौर्य), 2 वायु सेना पदक, 40 सेना पदक, 8 नौसेना पदक, 14 वायु सेना पदक (कर्तव्य भक्ती) यांचा समावेश आहे.



    यावेळी 26 जानेवारीच्या परेडमध्ये हरियाणाची झांकी खूप खास बनवण्यात आली आहे. नीरज चोप्राची लाइफ साइज प्रतिकृतीही त्या झांकीमध्ये दिसेल. राज्याच्या माहिती, जनसंपर्क आणि भाषा विभागाच्या संचालनालयाने शनिवारी ही माहिती दिली. हरियाणा राजपथ येथे ऑलिम्पिक वीरांच्या पराक्रमाचे प्रदर्शन करण्याची तयारी करत असताना 10 ऑलिंपियन हरियाणाच्या झांकीचा एक भाग असतील.

    दरम्यान, नीरज चोप्रा यांनी यूएसएमध्ये प्रशिक्षण सुरू केले आहे कारण ते पुढील हंगामाची तयारी करत आहेत. नीरज वर्ल्ड चॅम्पियनशिप, डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहेत. याशिवाय नीरज 2022च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करतील.

    Olympic gold medalist Neeraj Chopra awarded Distinguished Service Medal, 384 gallantry awards

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!

    IPL matches : 16 मेपासून IPL सुरू होण्याची शक्यता; उर्वरित 16 सामने तीन शहरांमध्ये होऊ शकतात

    Pakistan High Commission : पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना अटक; दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात लष्कराची माहिती पाठवत होते, ऑनलाइन पेमेंट घेत होते