• Download App
    ज्येष्ठांनो उत्तम आरोग्यासाठी बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करा|Old peoples must do work in home for health

    ज्येष्ठांनो उत्तम आरोग्यासाठी बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करा

     

    लंडन – बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल ‘बीएमजे ओपन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.Old peoples must do work in home for health

    ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची स्वत:ची दैनंदिन कामे आणि इतर घरातील छोटी कामे केल्याने त्यांची स्मृती टवटवीत राहते, प्रतिसाद क्षमता चांगली राहते, तसेच पायांमधील बळही टिकून राहण्यास मदत होते, असे या अहवालात म्हटले आहे. ‘ॲक्टिव्ह’ राहणाऱ्या ज्येष्ठांना चालताना किंवा जिना चढताना-उतरताना पडण्याची भीती वाटत नाही, असेही दिसून आले आहे.



    नियमित शारीरिक काम केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उतारवयाकडे झुकत असतानाही हात-पाय कामात गुंतवून ठेवल्यास आरोग्याचे अनेक धोके टळतात, असे दिसून आले आहे.

    श्रीमंत देशांमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये घरात काम न करण्याची प्रवृत्ती अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्यात वयानुसार येणाऱ्या आजारांचे प्रमाणही अधिक असते. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मात्र ज्येष्ठ नागरिक अधिक प्रमाणात कामे करतात, त्यामुळे त्यांची प्रकृती टिकून राहते.

    Old peoples must do work in home for health

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले