विशेष प्रतिनिधी
लखनऊ: माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जेलची हवा खायला लावणारे सक्तवसुली संचालनालयाचे संयुक्त संचालक राजेश्वर सिंह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांना सुलतानपूर येथे उमेदवारी देण्यात येणार आहे.Officer who arrested P. Chidaambaram is BJP candidate in Uttar Pradesh
राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. याबाबत त्यांनीच माहिती दिली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप त्यांना सुलतानपूर येथून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राजेश्वर सिंह यांनी जे निवेदन जारी केले आहे त्यात भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राजेश्वर सिंह यांनी १० वर्षे उत्तर प्रदेश पोलीस दलात सेवा बजावली. गेली १४ वर्षे ईडीमध्ये विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ११ वर्षांचा सेवाकाळ बाकी असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतली आहे. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जगत प्रकाश नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारताला जागतिक शक्ती आणि विश्वगुरू बनवण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पासाठी योगदान द्यायचे आहे. जनसेवेच्या या मार्गावर येथून पुढे निरंतर चालायचे आहे, असे राजेश्वर सिंह यांनी म्हटले आहे.
सहाराप्रमुख सुब्रत रॉय यांच्यावर २४ हजार कोटींच्या हाउसिंग फायनान्स घोटाळ्याचा आरोप झाला. त्यात कारवाई करत राजेश्वर यांनी सुब्रत रॉय यांना जेलमध्ये टाकलं. एअरसेल-मॅक्सिस डील प्रकरणात देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई करणारेही राजेश्वर सिंहच होते. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा,
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर डील अशा अनेक हायप्रोफाइल प्रकरणांत चौकशी पथकामध्ये राजेश्वर सिंह यांचा सहभाग होता. उत्तर प्रदेश पोलीस दलात असताना राजेश्वर सिंह हे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या नावावर १३ एन्काउंटर आहेत.
लखनऊमध्ये पोलीस उपअधीक्षक असताना गुन्हेगारीला त्यांनी मोठा लगाम लावला होता. २००९ मध्ये ते प्रतिनियुक्तीवर ईडीत गेले. २०१८ मध्ये त्यांना बेहिशेबी संपत्तीबाबत झालेल्या आरोपांमुळे चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. मात्र, त्यात काहीही निष्पन्न झाले नव्हते.
Officer who arrested P. Chidaambaram is BJP candidate in Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- राजकारण्यांची खुशामतखोरी कशाला? खाम नदी प्रकल्पाला माझे नाव नको… भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी औरंगाबाद आयुक्तांना लिहिले खरमरीत पत्र
- निर्मला सीतारामन यांच्या परखड प्रत्युत्तरानंतर काँग्रेसने चिदंबरम यांना उतरवले बजेटच्या मैदानात!!
- Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेले डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?, काय-काय होणार फायदे? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
- Budget 2022 : इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार आणणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी, काय होणार फायदे? वाचा सविस्तर…