विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे उद्यापासून म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून घरून काम करणार्या केंद्रीय कर्मचार्यांना पूर्ण कार्यालयीन हजेरी बंधनकारक असेल. त्याअंतर्गत कोणतीही सूट मिळणार नाही. वर्क फ्रॉम होम आता बंद झाले आहे. Office attendance is mandatory for central employees
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, उद्यापासून पूर्ण कार्यालयीन हजेरी पुन्हा सुरू करण्यात येणार असून सर्व स्तरावरील कर्मचारी कोणतीही शिथिलता न घेता नियमितपणे कार्यालयात हजर राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना नियमांचे पालन करावयाचे
केंद्रीय मंत्री म्हणाले की, विभाग प्रमुख हे सुनिश्चित करतील की कर्मचारी नेहमी फेस मास्क घालतील आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करत राहतील. कोरोना महामारीच्या फैलावामुळे, कार्मिक मंत्रालयाने ३ जानेवारीला आदेश जारी करून सांगितले की, सचिव स्तरावरील ५० टक्के कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Office attendance is mandatory for central employees
महत्त्वाच्या बातम्या
- उदयनराजेंनंतर हर्षवर्धन पाटील, कट्टर वैऱ्यांना भेटू लागले अजित पवार
- समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या कपड्यांना कर्नाटकातील शाळा- कॉलेजांमध्ये बंदी, हिजाबवरील वादानंतर सरकारचा निर्णय
- किरीट सोमय्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
- पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा चरणजीत चन्नी, राहुल गांधींची लुधियानात घोषणा; नवज्योत सिद्धूंना जबर धक्का