• Download App
    वादळी लाटांना रोखणार महाकाय भिंत, ओडिशा सरकारची नामी योजना Odisha will built long wall at sea shore

    वादळी लाटांना रोखणार महाकाय भिंत, ओडिशा सरकारची नामी योजना

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर – गेल्या काही वर्षांत ओडिशा आणि चक्रीवादळ असे जणू समीकरणच बनले आहे. साधारण दर दोन वर्षांनी राज्याचा वादळाचा तडाखा बसत असून त्याममुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. वादळाने निर्माण होणाऱ्या प्रचंड मोठ्या लाटांनी किनाऱ्यावरील मालमत्तेच अफाट नुकसान होते. ते थोपवण्यासाठी सरकारने आता वेगळीच शक्कल लढविली आहे. Odisha will built long wall at sea shore

    वादळी लाटांपासून संरक्षण करण्यासाठी सुमारे ३८० कि.मी.लांबीची क्षारयुक्त तटबंदी उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तब्बल १,९४४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ओडिशाला नुकताच यास चक्रीवादळाचा फटका बसला. भद्रक जिल्ह्यातील धामराजवळ धडकलेल्या या चक्रीवादळामुळे समुद्रात निर्माण झालेल्या लाटांचे क्षारयुक्त पाणी १२५ गावांत शिरले होते.

    ओडिशामध्ये अशा प्रकारची तटबंदी उभारण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यातील केंद्रपाडा, जगतसिंगपूर, पुरी आणि गंजम या जिल्ह्यांत यापूर्वी २०१३ ते २०१६ दरम्यान ५२ कि.मी.ची तटबंदी उभारण्यात आली. त्यासाठी, १३५ कोटी रुपये खर्च आला.

    पहिल्या टप्प्यात ३८० कि.मी.ची क्षारयुक्त तटबंदी उभारण्यात येणार असून जलसंपदा विभाग या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करत आहे. किनाऱ्यावर दगडांच्या माध्यमातून ही तटबंदी उभारली जाईल. चक्रीवादळादरम्यान समुद्रातील उंच लाटांमुळे ते एकमेकांपासून विलग न होण्यासाठी लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त करण्यात येतील. जोरदार वाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही केले जाईल.

    Odisha will built long wall at sea shore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही