• Download App
    ओबीसींना मिळणार भेट, क्रिमी लेअरची मर्यादा १० लाख रुपये करण्याची मोदी सरकारची शिफारस|OBCs to get gift, Modi government's recommendation to increase creamy layer limit to Rs 10 lakh

    ओबीसींना मिळणार भेट, क्रिमी लेअरची मर्यादा १० लाख रुपये करण्याची मोदी सरकारची शिफारस

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) मोठी भेट मोदी सरकारकडून मिळणा आहे. ओबीसी क्रिमी लेअरची मर्यादा १० लाखांपर्यंत वाढविण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. सध्या ही मर्यादा आठ लाख रुपये आहे. मर्यादा वाढल्यावर जास्तीत जास्त लोकांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.OBCs to get gift, Modi government’s recommendation to increase creamy layer limit to Rs 10 lakh

    मोदी सरकारने वैद्यकीय प्रवेशात देशपातळीवरील कोट्यात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता ही भेट मिळणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ही मर्यादा १२ लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळेल. इतर मागासवर्गीय समाज घटकांकडून दीर्घ काळापासून ही मागणी केली जात आहे.



    ओबी आरक्षणासाठी मर्यादा यापूर्वी २०१७ मध्ये वाढविण्यात आली होती. त्यावेळी असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून आठ लाख करण्यता आली होती. केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव विचारधिन असल्याचे सांगितले. दर तीन वर्षांनी क्रिमी लेअरच्या मर्यादेवर पुनर्विचार केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने ही तयारी सुरू केली आहे.

    यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यात येत आहे. संसदेच्या स्थायी समितीमध्येही यावर विचार सुरू आहे. यासाठी वेतनाचाही विचार करावा, असे म्हटले जात आहे. मात्र, ओबीसींकडून त्याचा विरोध होत आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे, त्यांनाच लाभ व्हावा असे म्हटले जात आहे.

    OBCs to get gift, Modi government’s recommendation to increase creamy layer limit to Rs 10 lakh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन!

    Terrorist attack : काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!