• Download App
    Nupur Sharma Profile : कोण आहेत नुपूर शर्मा? केजरीवाल यांच्याविरोधात लढवली होती निवडणूक लढवली, टीव्ही डिबेटमध्ये वादग्रस्त वक्तव्याचा आरोप|Nupur Sharma Profile: Who is Nupur Sharma? Kejriwal had contested the election against him, alleging controversial statements in a TV debate

    Nupur Sharma Profile : कोण आहेत नुपूर शर्मा? केजरीवाल यांच्याविरोधात लढवली होती निवडणूक लढवली, टीव्ही डिबेटमध्ये वादग्रस्त वक्तव्याचा आरोप

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून हा हिंसाचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुपूर यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे मुस्लिम समाजातील लोक संतप्त झाले होते.Nupur Sharma Profile: Who is Nupur Sharma? Kejriwal had contested the election against him, alleging controversial statements in a TV debate

    कानपूरमधील यतिमखाना येथील सदभावना चौकीजवळ मुस्लिम समाजाचे लोक बाजार बंद करत होते. यादरम्यान दोन समाजांचे लोक समोरासमोर आले, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. सुमारे 4 ते 5 तास चाललेल्या दंगलीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.



    यामुळे नुपूर शर्मा यांच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वसामान्यांना उत्सुकता आहे. त्यांची माहिती येथे देत आहोत…

    केजरीवालांविरुद्ध निवडणूक लढवली

    नुपूर शर्मा या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. 2015 मध्ये त्या पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभे केले होते. नुपूर भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाही होत्या. 2008 मध्ये ABVP कडून विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकणाऱ्या नुपूर एकमेव उमेदवार होत्या.

    2010 मध्ये विद्यार्थी संघटनेचे राजकारण सोडल्यानंतर नुपूर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये सक्रिय झाल्या. त्यांच्याकडे मोर्चातील राष्ट्रीय माध्यम प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्या नुपूर या पेशाने वकीलही आहेत. याशिवाय त्यांनी बर्लिनमधूनही शिक्षण घेतले आहे.

    डिबेटमध्ये म्हणाल्या – मी इतर धर्मांची खिल्ली उडवू शकते

    शुक्रवारी, 27 मे रोजी नुपूर वृत्तवाहिनीच्या चर्चेत पोहोचल्या. चर्चेदरम्यान त्यांनी आरोप केला की, काही लोक सातत्याने हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहेत. असे असेल तर मीही इतर धर्मांचीही खिल्ली उडवू शकते. नूपुर यांनी पुढे इस्लामिक श्रद्धांचा उल्लेख केला. हे मोहम्मद जुबेर नावाच्या तरुणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले असून नुपूरवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

    निवेदनानंतर जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या

    नुपूर यांच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ क्लिप शेअर होताच त्यांना बलात्कार, शिरच्छेदाच्या धमक्या मिळू लागल्या. यासाठी त्यांनी जुबेरला दोष दिला. नुपूर म्हणाल्या, ‘मी पोलिस आयुक्त आणि दिल्ली पोलिसांना कळवले आहे. मला शंका आहे की मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना इजा होऊ शकते. माझे किंवा माझ्या कुटुंबीयांचे काही नुकसान झाल्यास मोहम्मद जुबेर सर्वस्वी जबाबदार असेल.

    मुस्लिम संघटनांकडून खटले दाखल

    महाराष्ट्रातील सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीनेही नुपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नुपूर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. सोमवारी ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

    Nupur Sharma Profile: Who is Nupur Sharma? Kejriwal had contested the election against him, alleging controversial statements in a TV debate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य