• Download App
    महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द काढल्याने कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक|nsults about Mahatma Gandhi; Kalicharan Maharaj arrested from Madhya Pradesh

    महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द काढल्याने कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक

    वृत्तसंस्था

    भोपाळ : कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आज पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.nsults about Mahatma Gandhi;
    Kalicharan Maharaj arrested from Madhya Pradesh

    धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढलं होते. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उडाली होती. विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच त्यांच्या अटकेची मागणी केली होती.



    त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता वाढली होती. धर्मसंसदेत त्यांनी केलेल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला.

    त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्याविरूद्ध अपशब्द काढल्यामुळे संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आज अखेर त्यांना मध्यप्रदेशात पहाटे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेसाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सह विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली होती.

    nsults about Mahatma Gandhi; Kalicharan Maharaj arrested from Madhya Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट